पोलिस प्रशासन न्यूज.

जवळबन-लाडेगाव शिवारात अज्ञात हिंस्र प्राण्यांचा वावर,


जवळबन येथील ऊसाच्या शेतामध्ये गुरुवारी बिबट्याच्या पायाचे ठसे आढळले !

केज/प्रतिनिधी :

केज तालुक्यातील लाडेगाव शिवारातील पावनधाम कॉर्नर जवळील सर्व्हे नंबर १३५ मध्ये अमीन दस्तगिर शेख यांच्या शेतात दावणीला बांधलेल्या शेळ्या व बोकडांवर आज शनिवारी पहाटे २ ते ५ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात हिंस्र वन्य प्राण्यांकडुन जीवघेणा हल्ला करण्यात आला असून शेतकऱ्यांनी घाबरुन जाऊ नये सावध रहावे,आपले पशुधन सुरक्षित बंधीस्त गोठ्यात ठेवण्याचा प्रयत्न करावा.

रात्री शेतीत भिजवण्या साठी जाताना एकटे जाऊ नये समूहाने जावे.हातात उजेडासाठी बॅटरी,मोठी लाठी सोबत ठेवावी.शक्य असल्यास पाळीव कुत्रे सोबत घ्यावे.किल्लेधारूर वनविभागाकडे आवश्यक ती कार्यवाही करण्याची विनंती करण्यात आली असुन वन अधिकारी पवार साहेब,आर एफ ओ पाईक साहेब,भालेराव साहेब,गुणवंत साहेब हे आपल्या टीमसोबत जातीने ठिकाणावर पंचनामा करत आहेत.

तसेच यापुढे दैनंदिन धारूर वनविभागामार्फत चंदनसावरगाव,होळ, जवळबन,भाटुंबा, लाडेगाव,बोरीसावरगाव औरंगपूर,सावळेश्वर पैठण आदी लगतच्या शिवारात पेट्रोलिंग वाढवण्याची विनंती केली आहे.

 

–श्री.कुलदीप करपे

जिल्हाध्यक्ष,क्रांतिकारी शेतकरी संघटना,बीड जिल्हा


*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

77
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

error: Content is protected !!