पोलिस प्रशासन न्यूज.

घुंगर्डे हादगाव येथे पडिक घराची भिंत कोसळून दोन अल्पवयीन मुलांचा जागीच मृत्यू

अंबड तालुका | प्रतिनिधी

घुंगर्डे हादगाव येथे मंगळवारी दुपारी अत्यंत दुर्दैवी घटना घडली. बकरीसाठी चारा (शेवरीचा पाला) आणण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांच्या अंगावर पडिक घराची भिंत अचानक कोसळली. या अपघातात दोन्ही मुलांचा जागीच मृत्यू झाला.

मृत मुलांमध्ये शौर्य गोरख कासार (वय १३, रा. घुंगर्डे हादगाव) आणि चैतन्य राधाकिसन भिसे (रा. मारफळा, ता. गेवराई) यांचा समावेश आहे. चैतन्य भिसे हा मामाच्या गावी घुंगर्डे हादगाव येथे आला होता. दुपारच्या सुमारास दोघेही गावालगत असलेल्या पडिक घराजवळ शेवरीचा पाला तोडत असताना जीर्ण अवस्थेतील भिंत अचानक ढासळली. भिंतीखाली दबले गेल्याने दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी धाव घेतली व त्यांना अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषीत केले . घटनेनंतर संपूर्ण गावात शोककळा पसरली असून नागरिकांकडून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे गावात काही काळ शांतता पसरली होती.

दरम्यान, जीर्ण व पडिक इमारतींमुळे होणाऱ्या अपघातांचा धोका लक्षात घेता अशा इमारतींची तातडीने पाहणी करून आवश्यक ती कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. संबंधित प्रशासनाने घटनेची नोंद घेऊन पुढील कार्यवाही सुरू केली आहे.अंबड तालुका | प्रतिनिधी

घुंगर्डे हादगाव येथे मंगळवारी दुपारी अत्यंत दुर्दैवी घटना घडली. बकरीसाठी चारा (शेवरीचा पाला) आणण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांच्या अंगावर पडिक घराची भिंत अचानक कोसळली. या अपघातात दोन्ही मुलांचा जागीच मृत्यू झाला.

मृत मुलांमध्ये शौर्य गोरख कासार (वय १३, रा. घुंगर्डे हादगाव) आणि चैतन्य राधाकिसन भिसे (रा. मारफळा, ता. गेवराई) यांचा समावेश आहे. चैतन्य भिसे हा मामाच्या गावी घुंगर्डे हादगाव येथे आला होता. दुपारच्या सुमारास दोघेही गावालगत असलेल्या पडिक घराजवळ शेवरीचा पाला तोडत असताना जीर्ण अवस्थेतील भिंत अचानक ढासळली. भिंतीखाली दबले गेल्याने दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी धाव घेतली व त्यांना अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषीत केले . घटनेनंतर संपूर्ण गावात शोककळा पसरली असून नागरिकांकडून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे गावात काही काळ शांतता पसरली होती.

दरम्यान, जीर्ण व पडिक इमारतींमुळे होणाऱ्या अपघातांचा धोका लक्षात घेता अशा इमारतींची तातडीने पाहणी करून आवश्यक ती कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. संबंधित प्रशासनाने घटनेची नोंद घेऊन पुढील कार्यवाही सुरू केली आहे.

79
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!