पोलिस प्रशासन न्यूज.

गल्हाटी प्रकल्पात पाणी आणण्यासाठी सतीश घाटगेंचा पाठपुरावा


गुंज, साष्ट पिंपळगाव बंधाऱ्यासह, गल्हाटी प्रकल्पासाठी पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी*

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री विखे पाटील यांना निवेदन

 

जालना: अंबड तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी गेल्या २५ ते ३० वर्षांपासून गल्हाटी प्रकल्पासाठी उपसा सिंचन योजनेच्या मागणीसाठी समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन तथा भाजप नेते यांनी पुढाकार घेतला आहे. घनसावंगी तालुक्यातील गुंज व अंबड तालुक्यातील साष्ट पिंपळगाव उच्च पातळी बंधारे तसेच पाथरवाला बंधाऱ्यातून गल्हाटी मध्यम प्रकल्पात पाणी वळविण्याच्या २५ दलघमी पाणी योजनेला विशेष बाब म्हणून मान्यता देण्याची आग्रही मागणी त्यांनी केली आहे.

 

यासंदर्भात मंगळवारी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक जयंत गवळी यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. यावेळी गल्हाटी संघर्ष समितीचे अध्यक्ष राधाकिसन मैंद, उपाध्यक्ष पांडुरंग गटकळ, शांताई सामाजिक युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र छल्लारे, युवा नेते करण मिठे, मंगेश मुंढे, तान्हाजी धुमाळ, गोवर्धन वाघ, बाळू मुंढे, शंकर उंडे, शंकर पवळ, गोपाल रोटे, गंगाराम पवळ यांच्यासह मोठ्या संख्येने पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते.

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्याचा भाग जायकवाडी प्रकल्पाच्या कालव्याचा पुच्छ भाग असल्याने येथील लाभक्षेत्राला नियमित पाणी मिळत नाही. तसेच गल्हाटी मध्यम प्रकल्पात सातत्याने पाण्याची मोठी तूट निर्माण होत असल्याने परिसरातील शेती आणि नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट बनला आहे. या पार्श्वभूमीवर सतीश घाटगे यांनी प्रशासकीय व कायदेशीर बाजू मांडत शासनाचे लक्ष वेधले आहे. नाशिक येथील जलविज्ञान व धरण सुरक्षितता विभागाच्या तांत्रिक अहवालानुसार खालील बाजूस असलेल्या लोणी सावंगी बंधाऱ्यावर कोणताही विपरीत परिणाम न होता ७५% विश्वासार्हतेने १२.००४ दलघमी नक्त येवा उपलब्ध आहे. त्यामुळे पश्चिम वाहिनीचे पाणी खोऱ्यात येईपर्यंत उपलब्ध पाण्याचा आधार घेऊन गुंज व साष्ट पिंपळगाव बंधाऱ्यांचे काम प्राधान्याने मार्गी लावावे, अशी भूमिका घाटगे यांनी मांडली.

सतीश घाटगे यांनी केलेल्या प्रमुख मागण्या:

नाशिक जलविज्ञान प्रमाणित १२.००४ दलघमी उपलब्ध पाण्यानुसार गुंज (८ दलघमी) आणि साष्ट पिंपळगाव (७ दलघमी) बंधाऱ्यांना अंतरिम मंजुरी द्यावी.

नाशिक कार्यालयाकडून अहवाल मागवून तिन्ही योजनांसाठी २५.०० दलघमी पाण्याला विशेष बाब म्हणून अंतिम मंजुरी द्यावी.

गल्हाटी प्रकल्पातील तुटीवर मात करण्यासाठी पाथरवाला बंधाऱ्यातून १० दलघमी पाणी उचलण्यास प्राधान्याने मंजुरी द्यावी.

पश्चिम वाहिनीचे पाणी गोदावरी खोऱ्यात येताच तिन्ही प्रकल्पांना मूळ क्षमतेनुसार पूर्ण पाणीसाठा मंजूर करावा.

सर्व प्रकल्पांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे तातडीने आदेश द्यावेत.

मंत्रालय, पाटबंधारे महामंडळ व नाशिक जलविज्ञान विभागाची तातडीने संयुक्त बैठक घेऊन प्रलंबित तांत्रिक बाबी मार्गी लावाव्यात.


85
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!