पोलिस प्रशासन न्यूज.

*गाढे गव्हाण येथील गावगुंडावर कार्यवाही करा पोलिस अधीक्षक सिंधू यांच्या कडे वंचित बहुजन आघाडी कडून निवेदनाद्वारे मागणी*.


जाफ्राबाद.प्रतिनीधी (रामकिसन अवधूत): जाफ्राबाद तालुक्यातील गाढे गव्हाण येथील गावगुंडांनी दिनांक १९ मे २०२६ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर हौदोस घातला होता या पार्श्वभूमीवर शाखेच्या पदाधिकाऱ्यांसह वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांनी पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह सिंधू यांची शिष्टमंडळाने भेट घेतली व हौदोस घालणाऱ्या गावगुंडावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके, भिकाजी जाधव ,विजय सावंत ,बबन सावंत, भगवान घोरपडे, उत्तम सावंत, देविदास सावंत, कडूबा हिवाळे ,संतुकराव सावंत, राहुल सावंत ,विलास सावंत, अनिल हिवाळे, विष्णू सावंत, संजय सावंत, विठ्ठल दाभाडे ,अनिल खरात ,योगेश हिवाळे यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


78
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!