पोलिस प्रशासन न्यूज.

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बीडमध्ये राष्ट्रपती महोदयांच्या उपस्थितीत राजधानी दिल्ली गाजवलेला मर्दानी खेळांचा जल्लोष !


मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते होणार उद्घाटन

कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे गंगाधर काळकुटे यांचे आवाहन

बीड – प्रतिनिधी :

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बीड शहरात आज (दि. 19 फेब्रुवारी) सायंकाळी 06 वाजता छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर तत्कालीन महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद जी यांच्या उपस्थितीत दिल्ली येथील कार्यक्रम गाजवणारे, पारंपरिक मर्दानी खेळांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. शिवकालीन शौर्य, पराक्रम आणि परंपरेची आठवण करून देणारा हा दिमाखदार सोहळा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमात कोल्हापूर येथील नामांकित पथकाकडून पारंपरिक मर्दानी खेळांचे थरारक सादरीकरण करण्यात येणार असून तलवारबाजी, लाठी-काठी, दांडपट्टा आदी कौशल्यपूर्ण प्रकार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. शिवकालीन परंपरेची झलक आणि शौर्याची अनुभूती देणारे अनेक चित्तथरारक दृश्ये या कार्यक्रमात सादर केली जाणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित हा कार्यक्रम युवकांमध्ये पराक्रम, शिस्त आणि संस्कार यांची प्रेरणा निर्माण करणारा ठरणार आहे. बीड शहरासह तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक राजे संभाजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष, मराठा सेवक गंगाधर काळकुटे पाटील यांनी केले आहे.

शिवजयंतीच्या निमित्ताने बीडमध्ये पारंपरिक संस्कृतीचा आणि शौर्याचा हा सोहळा उत्साहात साजरा होणार असून नागरिकांमध्ये याबाबत मोठी उत्सुकता दिसून येत आहे.


77
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!