पोलिस प्रशासन न्यूज.

छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व जाती-धर्माचे : शिवव्याख्याती श्रुती जाधव


येवता येथे शिवजयंती सोहळा उत्साहात; सकाळी लहान मुलांची भाषणे व सायंकाळी कु.श्रुती जाधव यांचे व्याख्यान

​येवता |लाईव्ह अशोका टाईम्स. प्रतिनिधी : तालुक्यातील येवता येथे १९ फेब्रुवारी २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत देदीप्यमान आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. “शिवाजी महाराज हे केवळ एका विशिष्ट वर्गाचे नव्हे, तर ते सर्व जाती-धर्माचे आणि रयतेचे राजे होते,” असे प्रतिपादन शिवव्याख्याती कु. श्रुती गजेंद्र जाधव यांनी यावेळी केले.

​शिवआरतीने सोहळ्याचा प्रारंभ कार्यक्रमाची सुरुवात सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी उपस्थित लहान मुलींच्या हस्ते मनोभावे शिवआरती करण्यात आली. या प्रसंगी संपूर्ण गाव ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषाने दुमदुमून गेले होते.

​बाल मावळ्यांचा अनोखा उत्साह या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे शालेय विद्यार्थ्यांनी साकारलेली रूपे.व विद्यार्थ्यांनी ची भाषणे

​शिवराय, जिजाऊ माता आणि मावळ्यांच्या वेशभूषेत सहभाग नोंदवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

​शिवचरित्रावर आधारित भाषणे आणि प्रेरणादायी घोषवाक्यांनी उपस्थितांची मने जिंकली.

सायंकाळी कु.श्रुती जाधव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले.

​ शिवव्याख्याती कु. श्रुती जाधव यांनी आपल्या मार्गदर्शनात महाराजांच्या शौर्य, पराक्रम आणि आदर्श प्रशासकीय कौशल्याबद्दल सविस्तर माहिती दिली. आजच्या तरुण पिढीने महाराजांचे विचार आचरणात आणणे हीच खरी मानवंदना ठरेल, असा संदेश त्यांनी दिला. त्यांच्या या प्रभावी मांडणीचे ग्रामस्थांकडून सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.

​ग्रामस्थ आणि महिलांची मोठी उपस्थिती यावर्षीच्या शिवजयंती उत्सवात गावातील नागरिक व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवला. तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक, अबालवृद्ध आणि तरुणांनी एकत्र येऊन हा उत्सव आनंददायी केला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून गावामध्ये देशप्रेम, शौर्य आणि सुसंस्कारांची जपणूक करण्याचा एक सकारात्मक संदेश देण्यात आला.


77
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!