पोलिस प्रशासन न्यूज.

भोपला येथे शिवजयंतीचा सोहळा उत्साहात संपन्न; पहिल्यांदाच ‘सार्वजनिक जयंती’चे आयोजन


केज.भोपला (प्रतिनिधी):

भोपला ता.केज येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर, भोपला यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती अत्यंत दिमाखात साजरी करण्यात आली. विशेष म्हणजे, यंदा ‘संविधान चौक’ येथे ही पहिलीच सार्वजनिक जयंती साजरी करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला.

​कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संतोष जानराव (जगदंब बाऊसर पुणे संस्थापक) यांनी भूषविले. यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी नितीन शिंदे (उपाध्यक्ष – रा.प.म. चालक) आणि लक्ष्मण ज्ञानराव (सचिव) यांनी विशेष पुढाकार घेतला.

​याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून मारुती चंदनशिव सर, माजी सरपंच बाळासाहेब चंदनशिव सर, विजयसिंह जाधव, ग्रामपंचायत सदस्य विनोद शिंदे आणि तांबडे सर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपस्थित वक्त्यांनी शिवरायांच्या विचारांची आजच्या काळात असलेली गरज अधोरेखित केली.

​या सोहळ्यात गावातील तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांचा मोठा सहभाग होता. यामध्ये रवी चंदनशिव, सुनील चंदनशिव, नाना शिंदे, गणेश गोंड, नाना कांबळे, सागर जानराव, निखाल शिंदे, प्रेम शिंदे, सुरेश जानराव, रंजीत चंदनशिव, प्रशांत चंदनशिव, महादेव गोंड, सतीश चंदनशिव, लिबाजी जानराव, हनुमंत चंदनशिव, गणेश भिसे, शिंदू गोंड यांसह सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवगर्जना आणि जयघोषाच्या गजरात हा सोहळा अत्यंत आनंदाने पार पडला.


*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

77
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

error: Content is protected !!