पोलिस प्रशासन न्यूज.

लाईव्ह अशोका टाईम्स: विशेष वृत्त ​बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांना राज्यस्तरीय ‘महाराष्ट्राचे राजरत्न’ पुरस्कार जाहीर;


गुन्हेगारांचे कर्दनकाळ ठरलेल्या ‘आयपीएस’ अधिकाऱ्याचा गौरव!

​बीड | प्रतिनिधी

बीड जिल्ह्यामध्ये आपल्या कर्तव्यदक्षतेने आणि शिस्तीने गुन्हेगारी विश्वात धडकी भरवणारे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईच्या वतीने ‘महाराष्ट्राचे राजरत्न – २०२६’ हा मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अवघ्या एका वर्षाच्या कार्यकाळात जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलणाऱ्या या अधिकाऱ्याचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

​गुन्हेगारीचा खात्मा आणि सामाजिक सलोखा

​२१ डिसेंबर २०२४ रोजी नवनीत कॉवत यांनी बीड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदाची धुरा सांभाळली. त्यावेळी जिल्हा एका संवेदनशील वळणावर होता. मात्र, कॉवत यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर अवघ्या वर्षभरात जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडीत काढली. केवळ कायदा आणि सुव्यवस्थाच नव्हे, तर जातीय द्वेष दूर करून जिल्ह्यात सामाजिक सलोखा निर्माण करण्याचे अत्यंत कठीण काम त्यांनी लिलया पेलले. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत पत्रकार संघाने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे.

​यशाचा चढता आलेख

​२०१७ मध्ये लोणावळा येथे एसडीपीओ म्हणून प्रशासकीय सेवेला सुरुवात करणारे नवनीत कॉवत यांनी धाराशिवचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि छत्रपती संभाजीनगरचे पोलीस उपायुक्त म्हणून आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. एक आदर्श शिक्षक माता आणि भारतीय रेल्वेतून सेवानिवृत्त झालेले वडील यांच्या विचारांचा वारसा जपत त्यांनी जनसामान्यांच्या मनात पोलिसांविषयी विश्वासाचे नाते निर्माण केले आहे.

​प्रशासकीय वर्तुळातून कौतुकाचा वर्षाव

​महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश संपर्कप्रमुख वैभव स्वामी आणि महिला जिल्हाध्यक्ष शेख आयेशा यांनी या पुरस्काराची अधिकृत घोषणा केली आहे. हा सन्मान जाहीर झाल्याचे समजताच पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि राजकीय तसंच सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

​”गुन्हेगारांना वचक आणि सामान्य जनतेला सुरक्षा हेच आमचे ब्रीद आहे.” अशाच कार्यपद्धतीमुळे नवनीत कॉवत आज बीड जिल्ह्याचे ‘रिअल हिरो’ ठरले आहेत.


*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

77
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

error: Content is protected !!