पोलिस प्रशासन न्यूज.

पत्रकार रंजीत घाडगे यांना ‘निर्भीड लेखणी पुरस्कार’ जाहीर


केज | प्रतिनिधी

पत्रकारिता क्षेत्रातील निर्भीड, निःस्वार्थ आणि समाजाभिमुख कार्याची दखल घेत पत्रकार रंजीत घाडगे यांची ‘निर्भीड लेखणी पुरस्कार – २०२६’ साठी निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार राष्ट्रीय समता गौरव पुरस्कार – २०२६ अंतर्गत प्रदान करण्यात येणार आहे.

सामाजिक, मानवता आणि संविधानिक मूल्यांच्या जनजागृतीसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल तसेच पत्रकारितेद्वारे जनहिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडल्याबद्दल रंजीत घाडगे यांची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

हा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा रविवार, दि. २० सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२.०० वाजता नांदेड येथे आयोजित करण्यात आला असून, त्या कार्यक्रमात रंजीत घाडगे यांना ‘निर्भीड लेखणी पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात येणार आहे.

या सन्मानाबद्दल पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच मित्रपरिवाराकडून रंजीत घाडगे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजहिताचे प्रश्न निर्भीडपणे मांडत राहणाऱ्या रंजीत घाडगे यांच्या कार्याला मिळालेली ही महत्त्वपूर्ण पावती मानली जात आहे.


85
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!