पोलिस प्रशासन न्यूज.

*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*


सुखापूरी (प्रतिनीधी. रामकिसन अवधूत) अंबड तालुक्यातील वडी लासुरा येथे दि .19/04/2026 रविवार या दिवशी मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. ना. संजयजी शिरसाठ, मा. मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहायता) राहणार असून उद्घाटन मा. ना. हेमंतजी पाटील , (माजी खासदार तथा विधान परिषद सदस्य महाराष्ट्र)यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. आमदार नारायणराव कुचे उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर पूज्य भंते राजरत्न थेरो यांची धम्मदेसना लाभणार आहे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक पदाधिकारी यांचीही प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

 

या कार्यक्रमांतर्गत सकाळी धम्मध्वजारोहन, मूर्तींचे विधिवत अनावरण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर भीम वाणी हा भीम गीतांचा कार्यक्रमाच्या आयोजन करण्यात आले आहे, या कार्यक्रमात मान्यवरांचे मार्गदर्शनपर भाषण होणार असून यातून समाजाला शिक्षण, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा संदेश दिला जाणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे महत्त्व, तसेच तथागत गौतम बुद्ध यांच्या धम्म शिकवणीचा प्रसार यावर विशेष भर देण्यात येणार आहे.

 

कार्यक्रमादरम्यान विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून स्थानिक कलाकारांकडून गीत, वकृत्व आणि समाजप्रबोधनपर सादरीकरणे सादर केली जाणार आहेत. यामुळे कार्यक्रमाला अधिक रंगत येणार आहे.

 

या उत्सवात परिसरातील सर्व नागरिक, युवक, महिला व विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजकांकडून सर्वतोपरी तयारी करण्यात आली आहे.

 

कार्यक्रमानंतर उपस्थित सर्व नागरिकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून, या सामाजिक कार्यक्रमास उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन आयोजक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

 

हा कार्यक्रम सामाजिक ऐक्य, बंधुता व समतेचा संदेश देणारा ठरणार असून परिसरातील नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.


*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

77
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

error: Content is protected !!