जे.पी ॲडव्हरटाईजमेंट अँड मार्केटिंग बिझनेसचा स्तुत्य उपक्रम
केज:प्रतिनिधी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त जे पी ॲडव्हरटाईजमेंट अँड मार्केटिंग बिझनेस चे प्रमुख प्रशांत हजारे यांच्या वतीने पिण्याच्या पाण्याची व स्वीट नाश्त्याची उत्कृष्ट सोय करण्यात आली होती. या उपक्रमाचे हे ८ वे वर्ष असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला केज शहरातील तसेच बीड जिल्ह्यातील विविध राजकीय क्षेत्रातील मान्यवर नेत्यांनी उपस्थित राहून भेट दिली व उपक्रमाचे कौतुक केले. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमात मोठ्या संख्येने भीम सैनिक, उपासक व उपासिका सहभागी झाले होते. उपस्थितांनी पिण्याच्या पाण्याचा व नाश्त्याचा लाभ घेत आनंद व्यक्त केला.
समाजोपयोगी उपक्रमांमुळे जयंती उत्सवाला सामाजिक स्वरूप प्राप्त झाले असून, अशा उपक्रमांचे सर्वत्र स्वागत होत आहे.













