बोरगाव येथे वंचित बहुजन आघाडीतर्फे महात्मा फुले जयंती साजरी
जालना,रामकिसन अवधूत. (प्रतिनिधी): जालना
“महात्मा जोतिबा फुले यांनी सत्यशोधक विचारांच्या माध्यमातून समाजाला परिवर्तनाचा मार्ग दाखवला. आजच्या काळातही त्यांचे विचार तितकेच प्रस्तूत असून, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून समाज परिवर्तनासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध झाले पाहिजे,” असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके यांनी केले.
जालना तालुक्यातील बोरगाव येथे महात्मा जोतिबा फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते.
बौद्ध विहारासमोर उत्साहात अभिवादन
बोरगाव येथील बौद्ध विहारासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी महात्मा फुलेंच्या जयघोषाने परिसर दणाणून सोडला होता.
मान्यवरांची उपस्थिती
या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात प्रामुख्याने:
दिलीप मगर, दिगांबर गोरे, गणेश कायंदे, बद्रीनाथ कायंदे, आनंद लोंढे, सचिन लोंढे यांची उपस्थिती होती.
तसेच गावचे प्रतिष्ठित नागरिक वाघाजी डोके, सारंगधर डोके, मच्छिंद्र डोके, गणेश सुकदेव डोके, मदन डोके, संजय डोके, अनिल डोके, दिनकर डोके, बाबासाहेब वामनराव डोके, दीपक दत्ता डोके, किरण एकनाथराव डोके, महेंद्र नामदेव डोके, आनंद लिंबाजी डोके, निलेश डोके व किरण धर्माजी डोके उपस्थित होते.
महिलांचा मोठा सहभाग
कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे महिलांची लाभलेली मोठी उपस्थिती. यामध्ये मुक्ताबाई डोके, यमुनाबाई डोके, तारामतीबाई डोके, शिवगंगा पाडमुख, विमलबाई डोके, वर्षा डोके, सविता डोके, शिलाताई हिवाळे, आरती हिवाळे आणि आकांक्षा डोके यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्यांनी क्रांतिसूर्य महात्मा फुले यांना अभिवादन केले.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमातून समाज प्रबोधनाचा आणि एकजुटीचा संदेश देण्यात आला.












