पोलिस प्रशासन न्यूज.

येवता येथे ‘सोनारी पायी दिंडी सोहळा’ संपन्न; भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन


येवता प्रतिनिधी:

येवता ता.केज येथे श्री क्षेत्र सोनारीच्या काळभैरवनाथ महाराजांच्या आशीर्वादाने भव्य ‘सोनारी पायी दिंडी सोहळ्या’चे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक सोहळ्याची सुरुवात ८ एप्रिल २०२६ रोजी होत असून, १२ एप्रिल २०२६ पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

​या दिंडी सोहळ्याचे मार्गदर्शक म्हणून रमेश अरुण पुराजी हे काम पाहत आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी श्री. जालिंदर गायकवाड (मस्साजोग), श्री. महादेव जाधव (नांदूर- ज्ञानेश्वर वस्ती), श्री. गिरवली (इट- सकाळी नाश्ता), श्री. अर्जुन माने (वडाचीवाडी) आणि श्री. अभिमान नाकिंदे (पाटसांगवी) हे विशेष परिश्रम घेत आहेत.

​कार्यक्रमाची रूपरेषा:

दिंडी सोहळा ८ एप्रिल ते १२ एप्रिल २०२६ या कालावधीत संपन्न होईल. तसेच, २१ एप्रिल २०२६ रोजी विशेष कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

​भाविकांना आवाहन:

या दिंडी सोहळ्यादरम्यान भाविकांनी महाप्रसाद आणि कीर्तनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री.आश्रुबा राऊत,श्री.सुदाम खराडे,श्रीराम वायकर, वसुदेव राऊत या आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.


*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

77
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

error: Content is protected !!