पोलिस प्रशासन न्यूज.

गाढे गव्हाण येथील सरकारी रस्ता अडवल्या प्रकरणी सरपंच व ग्रामसेवक यांच्या वर कार्यवाही करा- वंचित बहुजन आघाडीची मागणी


जालना.प्रतिनीधी(रामकिसनअवधूत) :  जाफ्राबाद तालुक्यातील गाढे गव्हाण येथे महामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारका समोरील पुर्व नियोजित जागेवर या पुर्वी सरपंच व ग्रामसेवक यांच्या सहाय्याने अतिक्रमण करण्यात आले होते. वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्यामुळे पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी अतिक्रमण थांबवले आहे याचा राग मनात धरून पुन्हा डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या पारंपरिक जयंती मिरवणुकीचा सरकारी रस्ता सरपंच व ग्रामसेवक यांनी कैलास गिरी यांच्या सहाय्याने अडवला आहे तो तात्काळ पुर्ववत करण्यात यावा व याप्रकरणी कैलास गिरी यांच्या सह सरपंच व ग्रामसेवक यांच्या वर कार्यवाही करण्यात यावी या मागणीचे निवेदन जिल्हा परिषद उप मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप पवार यांची भेट घेऊन सादर करण्यात आले आहे‌.यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके, जिल्हा संघटक राजेंद्र खरात, शत्रुघ्न कोळी, विजय सावंत बबन सावंत योगेश हिवाळे रोहन हिवाळे राजु दाभाडे कडुबा हिवाळे संजय हिवाळे भगवान घोरपडे विलास सावंत यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

77
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

error: Content is protected !!