पोलिस प्रशासन न्यूज.

लखमापूरीच्या युवराज कांबळेची जवाहर नवोदय विद्यालय अंबा परतूर येथे दैदिप्यमान निवड


सुखापूरी (प्रतिनिधी):

अंबड तालुक्यातील लखमापूरी येथील गुणवंत विद्यार्थी युवराज अनिल कांबळे याने जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत 92.57 टक्के गुण मिळवले असून त्याची अंबा, परतूर येथील नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. या यशामुळे लखमापूरी गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

युवराजने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेत असताना हे यश मिळवले आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्याने जिद्द, सातत्य आणि मेहनतीच्या जोरावर आपले स्वप्न साकार केले. लखमापूरी येथील जिल्हा परिषद शाळेतून चार विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. सर्वच विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले; मात्र त्यापैकी युवराज अनिल कांबळे याची निवड झाली.

या यशामागे शाळेचे मुख्याध्यापक श्री. जोगी सर, खरमाटे सर तसेच श्रीमती बागल मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन व परिश्रम लाभले असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. शाळा, गाव आणि नातेवाईकांकडून युवराजवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

दरम्यान, आज लखमापूरी शाळेत नवोदय परीक्षेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास सुखापूरी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. आबा पटेकर सर, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री. अतुल गाडे, सुखदेव कासार, विष्णू महागोविंद, हरीदास कासार तसेच पालकवर्ग आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

युवराजच्या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी तो प्रेरणास्थान ठरत असून, योग्य मार्गदर्शन आणि मेहनत असल्यास कोणतेही ध्येय गाठता येते, याचे उत्तम उदाहरण त्याने घालून दिले आहे.


*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

77
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

error: Content is protected !!