पोलिस प्रशासन न्यूज.

माजी सैनिक चंदू कसबे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा


सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व मान्यवरांची उपस्थिती

केज:प्रतिनीधी:

माजी सैनिक तसेच एस.बी.आय. बँक केज येथील माजी कर्मचारी चंदू ज्ञानोबा कसबे कोरेगावकर यांचा वाढदिवस बीड रोड येथील पोलीस स्टेशन परिसरात सायंकाळी ७ वाजता उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

देशसेवा, शिस्तबद्ध जीवनशैली आणि समाजाप्रती असलेली आपुलकी यामुळे चंदू कसबे हे परिसरात प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कार्याचा गौरव करत उपस्थित मान्यवरांनी त्यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देत उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व यशस्वी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाला सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, मित्रपरिवार, पत्रकार बांधव व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते बाबुराव गालफाडे, प्रा. रमेश पाटोळे, आसाराम बाबर, आझाद क्रांती सेनेचे तालुका प्रमुख शरद थोरात, पत्रकार प्रदीप गायकवाड, लिंबराज गायकवाड, डॉ. क्षीरसागर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून कसबे यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी उपस्थितांनी चंदू कसबे यांच्या समाजाभिमुख कार्याचे कौतुक करत पुढील काळातही ते समाजासाठी प्रेरणादायी कार्य करत राहावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. वाढदिवसाचा कार्यक्रम आनंददायी वातावरणात पार पडला.


72
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!