पोलिस प्रशासन न्यूज.

बीड जिल्ह्यात इंधन पुरवठा सुरळीत; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन


बीड. प्रतिनिधी :

खाडी देशांतील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी नुकतीच पुरवठा विभागाची आढावा बैठक घेतली असून, जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती दिली आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून अनावश्यक साठा करू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

​गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई

​इंधन टंचाईची भीती दाखवून ग्राहकांकडून जादा पैसे उकळणे, घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर करणे आणि साठेबाजी करणे अशा तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी १९ विशेष पथकांची नियुक्ती केली आहे. या पथकांनी आतापर्यंत केलेल्या कारवाईचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

​तपासणी केलेली ठिकाणे: २०३

​अवैध वापर आढळलेली ठिकाणे: १३

​जप्त केलेले सिलिंडर: २८

​दाखल गुन्हे: ३ (इतर १० प्रकरणांत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे)

​तक्रारीसाठी ‘१०७७’ हेल्पलाईन

​जिल्ह्यात इंधन वितरणाबाबत काही समस्या असल्यास किंवा तक्रार निवारणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. नागरिकांनी तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक १०७७ वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी शिवकुमार स्वामी यांनी केले आहे.

​महत्त्वाचा संदेश: गॅस एजन्सींनी वेळेवर पुरवठा करावा आणि पारदर्शकता राखावी, असे निर्देशही सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना देण्यात आले आहेत.


72
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!