केज/प्रतिनिधी
केज नगरपंचायत मधील ‘प्रधानमंत्री आवास योजने’अंतर्गत (घरकुल) झालेल्या कोट्यवधींच्या कथित घोटाळ्याने संपूर्ण बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.गरिबांच्या हक्काचे पैसे ठेकेदार आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांनी संगनमताने लाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून,या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत उपविभागीय दंडाधिकारी यांनीसखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.या हाय-प्रोफाइल चौकशीमुळे भ्रष्ट अधिकारी,पुढारी आणि बोगस लाभार्थ्यांचे धाबे दणाणले आहेत.
नेमके प्रकरण काय?
केज नगरपंचायत अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेतील पात्र लाभार्थ्यांना हक्काचे पैसे मिळण्याऐवजी,ते पैसे नियमबाह्यपणे इतरत्र वळवण्यात आले आहेत. मे २०१९ ते जानेवारी २०२२ या कालावधीत म्हाडाकडून प्राप्तझालेला निधी आणि त्यावरील व्याजाची रक्कम लाभार्थ्यांना न देता,ती ठेकेदार व कर्मचाऱ्यांना धनादेशाद्वारे वाटण्यात आली.
घोटाळ्याची भीषणता,
निधीची लूट
३७४ लाभार्थ्यांच्या हक्काच्या ८ कोटी १० लाख रुपयांपैकी तब्बल ३ कोटी ६२ लाख रुपयांवर डल्लामारण्यात आला आहे.
फायली गायब
ज्या कामांसाठी पैसे दिले गेले,त्या कामांच्या कोणत्याही संचिका, देयके किंवा मोजमाप पुस्तके(Measurement Books) नगरपंचायत कार्यालयात उपलब्ध नाहीत.
नियमबाह्य व्यवहार
अर्धे तुम्ही घ्या,अर्धे आम्ही घेतो अशा भ्रष्ट तडजोडीतून हा सर्व प्रकार घडल्याचा संशय आहे.उप विभागीय दंडाधिकारी यांच्या कडून चौकशीचा फास आवळला जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या सूचनेनुसार,उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी आता या प्रकरणाची सूत्रे हाती घेतली आहेत.प्रशासनाने नगरपंचायतीकडून घरकुलांचे सर्व रेकॉर्ड्स, बँक स्टेटमेंट्स आणि लाभार्थ्यांची यादीताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे.
शासकीय योजनेचा पैसा गरजूंपर्यंत पोंहोचण्या ऐवजी जर तो चुकीच्या मार्गाने जात असेल,तर त्याची गय केली जाणार नाही.दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.
प्रशासन सूत्रे कोणाचे चेहरे समोर येणार?
समितीने बँकेकडून व्यवहारांचे सर्व तपशील मिळवले असून,त्यातून पैसे लाटणाऱ्यांची एक मोठी यादी समोर आली आहे.यामध्ये केवळ धनादेश देणारे अधिकारी च नव्हे,तर बेकायदेशीर पणे पैसे स्वीकारणारे ठेकेदार,कर्मचारी आणि काही भ्रष्ट स्थानिक पुढारी देखील उप विभागीय दंडाधिकारी यांच्या रडारवर आले आहेत.या चौकशीतून केज शहरातील भ्रष्टाचाराचे नेमके किती ‘बडे मासे’ गळाला लागतात,याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.













