पोलिस प्रशासन न्यूज.

पुणे येथे उत्कृष्ट निवेदक पुरस्कार मिळाल्याबद्दल महादेव इनकर यांचा भव्य सत्कार


बीड | प्रतिनिधी:

पुणे येथे प्रदान करण्यात आलेला “उत्कृष्ट निवेदक” हा मानाचा पुरस्कार मिळवून आपल्या कार्याची छाप उमटविणाऱ्या महादेव इनकर यांचा शहरात उत्साहात सत्कार करण्यात आला. विविध सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी नगरसेवक प्रमोद अण्णा शिंद, कपिल सौदा, सिद्धार्थ शिंगारे, बंडू निसर्गंध, मायकल वाघमारे, पिंटू गव्हाणे, वंचित बहुजन आघाडीचे नेते संतोष जोगदंड, ईश्वर धनवे, केतन गायकवाड, जानू वाघमारे, दीपक कांबळे, श्याम जाधव डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन मित्रपरिवार आदी उपस्थित होते. मान्यवरांनी महादेव इनकर यांच्या निवेदन कौशल्याचे, प्रभावी आवाजाचे व सामाजिक भान जपणाऱ्या कार्याचे कौतुक केले. त्यांनी विविध सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये आपल्या उत्कृष्ट निवेदनातून कार्यक्रमांना वेगळी उंची दिली असल्याचे गौरवोद्गार काढण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत असेच यश संपादन करण्याचा विश्वास व्यक्त केला. सत्कार सोहळा आनंददायी वातावरणात पार पडला.


*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

77
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

error: Content is protected !!