पोलिस प्रशासन न्यूज.

आजच्या युवक युवतींनी शिक्षण हे निरंतर घेतले पाहिजे -प्राचार्य डॉ. हरिदास फेरे


सरस्वती महाविद्यालयात आजीवन शिक्षण आणि विस्तारविभाग कार्यशाळा उद्घाटन कार्यक्रम संपन्न

केज/प्रतिनिधी : माऊली विद्यापीठ संचलित,सरस्वती महाविद्यालय,केज येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर व आजीवन शिक्षण आणि विस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी समुपदेशन,व्यवसाय मार्गदर्शन व प्लेसमेट कार्यशाळेचे दिनांक २१ जानेवारी रोजी कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व उद्घाटक म्हणून वसंतराव काळे महाविद्यालय,ढोकी ता. जि.धाराशिव येथील मा. प्राचार्य प्रोफेसर डॉ. हरिदास फेरे सर लाभले होते.दुसऱ्या सत्राचे प्रमुख पाहुणे म्हणून मा.जाधव राजेश उत्तम सदस्य, एलआयसी कॉर्पोरेट क्लब बीड व जनविकास महाविद्यालय,बनसारोळा येथील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ.राजेश गायकवाड हे लाभले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष महा विद्यालयाचे मा.प्राचार्य डॉ.जी.बी.पाटील व आजीवन शिक्षण आणि विस्तार विभागाच्या कार्यक्रमाधिकारी डॉ. अर्चना वाघमारे यांची विचार मंचावर उपस्थिती होती.प्रमुख पाहुणे यांचा परिचय इंग्रजी विगाग प्रमुख व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयक डॉ.वैशाली आहेर यांनी करून दिला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आजीवन शिक्षण आणि विस्तार विभागाच्या कार्यक्रमाधिकारी डॉ. अर्चना वाघमारे यांनी आपल्या प्रास्ताविका मध्ये कार्यशाळेचे उद्दिष्ट व हेतू सांगताना म्हटले की, समुपदेशन,व्यवसाय मार्गदर्शन व प्लेसमेंट कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयीन स्तरावर युवक- युवतीना पदवी नंतर रोजगाराच्या वेगवेगळ्या संधी प्राप्त व्हाव्यात व विद्यार्थ्यांना सक्षम बनविण्यासाठी पदवी अभ्यासक्रमा बरोबरच व्यावसायीक व इतर नोकरीच्या संधी जसे की स्पर्धा परीक्षा,लेखी व तोंडी मुलाखती कशा असतात.एम.पी.एस.सी, यु.पी.एस.सी.आणि नेट- सेट व स्थानिक नोकर भरतीत विशेष कौशल्य संपादन कसे करावे अशा प्रकारची माहिती सांगून आजीवन शिक्षण आणि विस्तार विभाग कार्यशाळे चा मुख्य उद्देश सांगितला आहे.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.प्राचार्य प्रोफेसर डॉ.हरिदास फिरे यांनी म्हटले की,आजीवन शिक्षण आणि विस्तार विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात कौशल्य आत्मसात केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी आपले ज्ञानेंद्रिय सक्षम करावी लागतील,जीवनात काय चांगले आणि काय वाईट यातील फरक कळण्या साठी ज्ञानेंदिय सतत कार्यशिल राहणे अपेक्षित आहे.जीवनात संधी मिळाली तर माणसाची शक्ती प्रकट होत असते. आणि ती प्रकट होत असताना ती वाढतही असते म्हणून आत्म परीक्षण करून स्वतः मधील अवगुणांचेउच्चाटन करणे हे एक मोठे आव्हान आहे.आजीवन शिक्षणाचे महत्त्व ओळखून शिक्षण घ्या. प्रौढ शिक्षण,अनौपचारिक शिक्षण व आजीवन शिक्षण ही व्यक्ती,समाज व राष्ट्र प्रगतीची प्रमुख त्रिसूत्री आहे.याविश्वातील अनेक प्रगत राष्ट्रांनी या त्रिगुणात्मक विकास करून घेतला आहे. सध्याच्या आधुनिकयुगात आजीवन शिक्षणाची आबाल-वृद्धांना,स्त्री- पुरुषांना,शिक्षित- अशिक्षितांना नितांत गरज आहे कारण प्रचंड प्रमाणात वाढणारे सर्वच ज्ञान आपण फक्त सध्याच्या औपचारिक पद्धतीने घेऊच शकत नाही.असे म्हटले जाते की,मानव हा विकसन शील सामाजीक, बुद्धिमान,प्राणी आहे मानव प्राणी इतर प्राण्यां हून श्रेष्ठ समजला जातो तो त्याच्या बद्धिमत्तेमुळेच परंतु ज्या बद्धिमत्तेच्या जोरावर मानवानेप्रगतीची घोडदौड केली आहे.ती केवळ शिक्षणामुळेच केली आहे.तेव्हा आजच्या युवक -युवतींनी शिक्षण हे निरंतर घेतले पाहिजे असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.अध्यक्षीय समारोप प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी.बी.पाटील यांनी म्हटले की,आधुनिक संगणकयुगाच्या काळात फक्त औपचारिक शिक्षण घेऊनच व्यक्तीची प्रगती होणार नाही.तर समाजा तील सामाजिक,आर्थिक, सांस्कृतिक,धार्मिक मूल्यांचा विचार देखील विद्यार्थ्यांनी केला पाहिजे तरच राष्ट्राच्या प्रगतीला हातभार लागू शकतो. यासाठी विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास निर्माण करून सक्षम बनले पाहिजे.यासाठी आजीवन शिक्षणाने विद्यार्थ्यांना आत्मविश्वास निर्माण होऊन वेगवेगळ्या नोकरीच्या संधी काय आहेत हे जाणून घेण्यासाठी आजीवन शिक्षण आणि विस्तार विभाग अतिशय महत्वाची कामगिरी बजावताना दिसत आहे. असे सविस्तर मार्गदर्शन त्यांनी या प्रसंगी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ.किरणकुमार धिमधिमे यांनी केले तर आभार महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ.अशोक घोडके यांनी मानले.या कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षिकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.


*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

77
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

error: Content is protected !!