केज | वार्ताहर
येवता (ता. केज) येथे त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांची १२८वी जयंती अत्यंत उत्साहात आणि धम्ममय वातावरणात बौद्ध विहारात साजरी करण्यात आली. यावेळी गावातील नागरिक, महिला आणि तरुण मंडळाने एकत्र येत माता रमाईंच्या प्रतिमेस अभिवादन करून त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.
माता रमाईंच्या त्यागाला अभिवादन
कार्यक्रमाची सुरुवात माता रमाई यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. यावेळी उपस्थितांनी माता रमाईंच्या जीवनावर प्रकाश टाकला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विश्वरत्न होण्यामागे माता रमाई यांचा मोठा त्याग होता. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतही त्यांनी धिर न खचता बाबासाहेबांना साथ दिली, असे विचार यावेळी व्यक्त करण्यात आले.
या अभिवादन कार्यक्रमाला उपासक, उपासिका, राजकीय आणि सामाजिक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. यामध्ये:
लिंबराज गायकवाड (वंचित बहुजन आघाडी)
सुरज काळे (रिपाई ITसेल ता.अध्यक्ष) व धम्म बांधव,महिला
बालासाहेब गायकवाड
संजय गायकवाड
राहुल काळे
वचिष्ट साळवे
सचिन गायकवाड (माजी ग्रामपंचायत सदस्य)
विनोद काळे
सिद्धार्थ काळे
रोहित गायकवाड
वैभव जाधव
पृथ्वीराज गायकवाड. व इतर ग्रामस्थ व महिलांचा मोठा सहभाग लाभला.यावेळी भीमशक्ती बचत गटाच्या अध्यक्षा.रजनी गायकवाड , सुरेखा गायकवाड, एकल महिला संघटनेच्या रतन गायकवाड.व इतर उपासिका. मंदाकिनी गायकवाड, वंदना गायकवाड, सिमा काळे,निकीता काळे
यांच्यासह गावातील उपासक. उपासिका व इतर प्रतिष्ठित नागरिक आणि लहान-थोर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
महिलांचा मोठा सहभाग
विशेष म्हणजे, या जयंती उत्सवात गावातील महिलांचा सहभाग लक्षणीय होता. यावेळी ‘माता रमाईंचा विजय असो’ आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.
शेवटी उपस्थित सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.











