पोलिस प्रशासन न्यूज.

येवता पंचायत समिती’च्या ओबीसी महिला गटातून उद्धव जोगदंडच्या पत्नीस काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीची मागणी!


   केज प्रतिनीधी :​   खा. रंजनीताई पाटील यांचे  निकटवर्तीय उद्धव जोगदंड यांच्या पत्नीस काॅग्रेंसकडून संधी मिळणार? दुष्काळात केलेल्या मदतीमुळे जोगदंड कुटुंबावर जनतेचा विश्वास! आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राजकीय वातावरणात उत्सुकता वाढली आहे. नुकतेच आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेक पक्षांतील इच्छुकांचे मनसुबे बाहेर पडू लागले आहेत. यातच, केज तालुक्यातील येवता पंचायत समिती गणातून काँग्रेस पक्षाकडून योगेश्वरी उद्धव जोगदंड यांना उमेदवारी द्यावी, अशी जोरदार मागणी जनतेतून पुढे येत आहे. ओबीसी महिला आरक्षणामुळे मागणीला जोर: येवता पंचायत समितीचा गण हा यावेळी ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाकडून योगेश्वरी उद्धव जोगदंड यांना उमेदवारी देण्यासाठी जनतेचा आग्रह वाढला आहे. योगेश्वरी जोगदंड यांचे पती उद्धव जोगदंड हे गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. रंजनीताई पाटील यांच्याशी निकटचे संबंध:जोगदंड कुटुंब काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते असून, त्यांचे काँग्रेस नेत्या आणि माजी राज्यसभा खासदार रंजनीताई पाटील यांच्याशी जवळचे संबंध आहेत. तसेच, माजी मंत्री अशोक दादा पाटील,आदित्य दादा पाटील,व राहुल भैय्या सोनवणे यांच्या निकटवर्तीयांमध्ये त्यांची गणना होते. दुष्काळसदृश्य परिस्थितीत सक्रिय काम:मागील काळात आलेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जोगदंड कुटुंबाने महत्त्वपूर्ण काम केले आहे. या कार्याची दखल घेत, इच्छुक उमेदवार समोर येत असतानाही काँग्रेसने योगेश्वरी उद्धव जोगदंड यांनाच उमेदवारी द्यावी, अशी एकमुखी मागणी जनतेतून जोर धरू लागली आहे. काँग्रेसचे निष्ठावान व केज तालुक्यात ओळख असलेले कै. चेअरमन बाळासाहेब(नाना)जोगदंड यांच्या कुटुंबीयातील योगेश्वरी उद्धव जोगदंड यांचे नाव आता पंचायत समिती सदस्य म्हणून समोर येत आहे.येवता पंचायत समितीच्या राजकारणात जोगदंड कुटुंबाचा प्रदीर्घ संपर्क आणि त्यांनी केलेले सामाजिक कार्य पाहता, जनतेच्या मागणीचा काँग्रेस पक्ष विचार करून योगेश्वरी जोगदंड यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


57
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!