पोलिस प्रशासन न्यूज.

येवता येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात; जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत ध्वजारोहण संपन्न


मुख्याध्यापिका कोकाटे मॅडम यांच्या हस्ते तिरंग्याला मानवंदना; ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती

​येवता (ता. केज):

भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा वर्धापन दिन जिल्हा परिषद माध्यमिक (अनु.) शाळा, येवता येथे अत्यंत उत्साही आणि मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी गावातील प्रमुख पदाधिकारी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली.

​कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असलेले ध्वजारोहण शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती कोकाटे मॅडम यांच्या हस्ते संपन्न झाले. राष्ट्रगीत आणि ध्वजगीताच्या सुरावटीत तिरंग्याला सलामी देण्यात आली. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी दिलेल्या ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम’च्या घोषणांनी शालेय परिसर देशमय झाला होता.

​ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची उपस्थिती:

या सोहळ्याला ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांनी विशेष उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि शाळेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि पालकांची देखील मोठी उपस्थिती होती.

​शिक्षक वृंदाचे योगदान:

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक श्री. रुद्रे सर, श्री. जाधव सर, श्री. कांबळे सर, श्री. रोडे सर, श्री. जोगदंडे सर, श्री. जोगदंड अशोक सर, श्री. वाघमारे सर, श्री. गायसमुद्रे सर, श्री. श्रीराम सर आणि श्री. येवतेकर सर यांनी विशेष परिश्रम घेतले.तसेच शालेय व्यवस्थापन समीतीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य यांची उपस्थिती लाभली.

​विद्यार्थ्यांनी यावेळी संचलन करून उपस्थितांची मने जिंकली.


*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

77
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

error: Content is protected !!