पोलिस प्रशासन न्यूज.

मुप्टा बीड जिल्हा वतीने गुणवंत विद्यार्थी चि. अभिवादन जावळे यांचा गौरव


बीड | प्रतिनिधी

एसएससी परीक्षा 2026 मध्ये चि. अभिवादन शशिकांत जावळे याने 82.20 टक्के गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले. त्याच्या या यशाबद्दल मुप्टा बीड जिल्हा वतीने त्याचा यथोचित सन्मान करण्यात आला.

 

या सन्मान सोहळ्यात मुप्टा बीड जिल्हाध्यक्ष शरदराव मगर, जिल्हाध्यक्ष (मा.) प्रविण तरकसे, प्रा. बाळासाहेब गव्हाणे, प्रा. सुनील मोरे, डॉ. शशिकांत गायकवाड, प्रा. नितीन भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

 

उपस्थित मान्यवरांनी चि. अभिवादन जावळे याचे अभिनंदन करत पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्याच्या मेहनत, जिद्द व चिकाटीमुळे हे यश मिळाल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी त्याच्याकडून प्रेरणा घ्यावी, असे मत व्यक्त करण्यात आले.


78
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!