पोलिस प्रशासन न्यूज.

वंचित बहुजन आघाडीची अंबड तालुका आढावा बैठक संपन्न


         प्रतिनिधी(रामकिसन अवधूत) अंबड, दि. 17 ऑक्टोबर 2025 – आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीची अंबड तालुका आढावा बैठक हॉटेल वृंदावन येथे संपन्न झाली. या बैठकीचे अध्यक्षस्थान वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष मा. सतिष मामा खरात यांनी भूषविले.

 

या बैठकीस अंबड तालुक्यातील तसेच अंबड शहरातील असंख्य कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे उपस्थिती दर्शविली. बैठकीदरम्यान मा. सतिष मामा खरात यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना संघटन बळकट करण्याचे आणि पक्षाच्या विचारधारेचा प्रसार करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात जेष्ठ नेते मा. विष्णूकुमार शेळके यांनी निवडणूक कशी लढवावी, प्रचार कसा करावा याविषयी आपले अनुभव कार्यकर्त्यांसमोर मांडले. तसेच मा. सुभाष ससाणे (आबा) यांनीदेखील आपले मोलाचे अनुभव शेअर केले.अंबड तालुका अध्यक्ष मा. किशोर भाऊ तुपे यांनी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची मते मांडली. यावेळी निवडणूक पक्ष आदेशानुसार लढविण्याचे ठरविण्यात आले. दुसऱ्या पक्षासोबत युती झाल्यास एकत्रित निवडणूक लढविण्याचा आणि युती न झाल्यास स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेण्यात आला.या बैठकीस जिल्हा व तालुका पातळीवरील अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये जिल्हा उपाध्यक्ष मा. सतिष मामा खरात, जिल्हा कार्याध्यक्ष परमेश्वर खरात, जिल्हा उपाध्यक्ष मा. आप्पासाहेब झाकणे, जिल्हा सल्लागार मा. गोवर्धन जाधव, जिल्हा संघटक मा. सुभाष आबा ससाणे, जिल्हा सचिव शेषराव शिनगार, अंबड शहराध्यक्ष मा. अशोक भाऊ साळवे, अंबड तालुका अध्यक्ष मा. किशोर भाऊ तुपे, तालुका महासचिव ॲड. शेळके साहेब, तसेच अंबड शहर उपाध्यक्ष मा. अतिष खरात यांचा समावेश होता.या बैठकीमुळे अंबड तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून, आगामी निवडणुकांसाठी पक्ष कार्यकर्ते सज्ज झाल्याचे चित्र पाहायला मिळाले .


*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

77
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

error: Content is protected !!