पोलिस प्रशासन न्यूज.

स्थानिक प्रश्नांसाठी जागरूक व्हा! वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या ताकदीने विजयी करा: सुजात आंबेडकर


अंबाजोगाई:=अंबाजोगाईत वंचित बहुजन आघाडीच्या प्रचार सभेला तुफान गर्दी; नितीन सरवदे आणि मुद्रीकाबाई जोगदंड यांच्यासाठी आवाहन.

​बीड,अंबेजोगाई := आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने (VBA) विजयाचा निर्धार व्यक्त करत आंबेजोगाई येथे भव्य जाहीर सभा घेतली. या सभेला पक्षाचे युवा नेते सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. आंबेजोगाई नगरपरिषदेसाठी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नितीन शंकर सरवदे आणि मुद्रीकाबाई पतीराज जोगदंड यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली होती.

​ ‘आरक्षणवादी जनतेने सत्तेचे वाटेकरी बनावे’

​सभा संबोधित करताना सुजात आंबेडकर यांनी जनतेला स्थानिक समस्यांवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. “आता आरक्षणवादी, संविधानवादी जनतेने आपल्या स्थानिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी जागरूक होण्याची गरज आहे,” असे ते म्हणाले.

​वंचित बहुजन आघाडीने लढाऊ, कार्यक्षम आणि जनतेतून उभे राहिलेले उमेदवार मैदानात उतरवले आहेत, यावर त्यांनी भर दिला. “या लढणाऱ्या कार्यकर्त्यांना मतदान करून त्यांना विजयी करा आणि स्वतः सत्तेचे वाटेकरी बना,” असे भावनिक आवाहन त्यांनी केले.

​सभेला सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्य प्रवक्ता प्रशांत बोराडे, पूर्व जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे, पुर्व युवक जिल्हाध्यक्ष बाबुराव मस्के.महासचिव मिलींद घाडगे .तसेच आंबेजोगाई,धारुर,केज,व बीड येथील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेमुळे आंबेजोगाई परिसरात निवडणुकीचे तापमान चांगलेच वाढले असून, वंचित बहुजन आघाडीच्या प्रचार मोहीमेला मोठी गती मिळाल्याचे चित्र आहे.


*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

77
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

error: Content is protected !!