पोलिस प्रशासन न्यूज.

वंचित बहुजन आघाडी धारूर तालुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडनुक ताकतीने लढणार – इंजी. प्रशांत उघडे


धारूर – तालुक्यातील आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी धारूर तालुक्यात ताकतीने निवडणुका लढविणार असल्याचे माहिती वंचित बहुजन आघाडीचे धारूर तालुकाध्यक्ष इंजि. प्रशांत उघडे यांनी प्रसिद्धीपत्रकात माहिती दिली आहे.धारूर तालुक्यात जिल्हा परिषदेचे 3 गट व पंचायत समितीचे 6 गण असुन वंचित बहुजन आघाडी सर्व जागेवर उमेदवार उभे करून वंचित उपेक्षित समुहाने एकत्रित करून धारूर तालुक्यातील जनतेला सत्तेत जाण्यासाठी उमेदवारांच्या माध्यमातुन पर्याय उभा करणार आहे. 2024 विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर राज्यात सर्वसामान्य जनतेच्या, शेतकऱ्यांची, वंचित, उपेक्षित आदिवासी, ओबीसी समुहाची बाजु मांडणारा एकही पक्ष राज्यात राहिलेला नाही. या सर्व समुहाची बाजु मांडणारा एकमेव पक्ष आणि एकमेव नेता राज्यात असेल तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहेत. या सर्व समुहाला एकत्रित करून वंचित बहुजन आघाडी धारूर तालुक्यात आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सामोर जाण्याची माहिती तालुकाध्यक्ष इंजी प्रशांत उघडे यांनी दिली.


71
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!