बीड: बीडमध्ये वंचित बहुजन आघाडीचे रणशिंग; प्रस्थापितांना ‘झोपडी विरुद्ध बंगला’ मुद्द्यावरून आव्हान. वंचित बहुजन आघाडी (वंबआ) बीड शहर संघटन बळकट करण्याच्या उद्देशाने शहर महासचिव संदीप जाधव यांच्या पुढाकाराने त्यांच्या भागात नव्या पक्ष कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन करण्यात आले. हे उद्घाटन जिल्हाध्यक्ष अजय सरवदे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी बीडमधील प्रस्थापितांना धडा शिकवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.मान्यवरांची उपस्थिती.उद्घाटन सोहळ्याला जिल्हा उपाध्यक्ष पुरुषोत्तम (गोटू) वीर, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख राजेशकुमार जोगदंड, युवा नेते प्रकाश उजगरे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष रोहन मगर, माथाडी विंगचे जिल्हाध्यक्ष आकाश जावळे, बीड शहराध्यक्ष लखन जोगदंड, युवा शहर उपाध्यक्ष सुशील काकडे, युवा नेते प्रेम कांबळे
यांच्यासह त्या भागातील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हाध्यक्षांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन:- यावेळी जिल्हाध्यक्ष अजय सरवदे यांनी उपस्थित जनतेस आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “वंचित बहुजन आघाडी हा पक्ष वंचित आणि शोषित पिढीचा आहे. आपले प्रश्न आपणच सोडवायचे आहेत, म्हणून या पक्षाच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहा.” डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मोलाचा संदेश देताना ते म्हणाले, “दुसऱ्याच्या बंगल्यात जाण्यापेक्षा स्वतःची झोपडी शाबूत ठेवा.” प्रस्थापितांवर कठोर टीका. सरवदे यांनी बीडमधील सध्याच्या राजकारणावर कठोर टीका केली. ते म्हणाले की, “आज बीडमधील काही लोक आंबेडकरी चळवळीच्या नावाखाली फक्त सोंग घेतात. स्वतःची झोपडी तुटली तरी चालेल, पण बीडमधला ‘बंगला’ उभा राहावा म्हणून ते त्याच्याच अधिपत्याखाली काम करतात.”संघर्षाच्या वेळी गैरहजर राहणाऱ्या नेत्यांवर निशाणा साधत त्यांनी सांगितले की, “महाबोधी महाविहार आंदोलनाच्या काळात समाधानासाठी साथ देणारे योगेश क्षीरसागर किंवा आमदार संदीप क्षीरसागर हे केवळ तुमची मते घेण्यासाठीच समोर येतात पण संघर्षाच्या वेळी ते कधीच सहभागी होत नाहीत.”तसेच, बंगल्याच्या अधिपत्याखाली निवडून आलेल्या नगरसेवकांवर टीका करताना ते म्हणाले की, ते युवकांना व्यसनाधीन करून त्यांचे भविष्य नष्ट करतात. “अशा नगरसेवकांना पुन्हा कधीही निवडून देऊ नका,” अशी घणाघाती टीका सरवदे यांनी केली. शहर सचिवांनी व्यक्त केला विश्वास,कार्यक्रमाच्या शेवटी शहर महासचिव संदीप जाधव यांनी मतदारांनी वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे, अशी विनंती केली. लवकरच उघडलेल्या पक्ष कार्यालयाच्या फलकावर “नगरसेवक” ही पदवी लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उपस्थितांनी संदीप जाधव यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.












