पोलिस प्रशासन न्यूज.

शिक्षक मुलीचा वाढदिवस शालेय साहित्य वाटप करून संपन्न;


बीड/प्रतिनिधी:= केक ऐवजी डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक कार्यात नेहमीच सहभाग नोंदवणाऱ्या सेवानिवृत्त जिल्हा प्रबंधक (एलआयसी) यू.एस. वाघमारे यांनी आपली शिक्षिका कन्या प्रियांका हिचा वाढदिवस एका स्तुत्य उपक्रमाने साजरा केला.​प्रियांका यांनी आपला वाढदिवस न्यू रायझिंग स्टार इंग्लिश स्कूल, कुक्कडगांव येथील ४१ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य (वही-पेन्सिल) वाटप करून संपन्न केला. या कार्यक्रमात केक कापण्याच्या प्रथेपासून दूर राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आणि मेणबत्ती पेटवून वाढदिवस साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात प्रियांका टिचरला शुभेच्छा दिल्या, ज्यामुळे विद्यार्थी, प्रियांका आणि तिच्या पालकांचे मन आनंदाने भरून आले.यावेळी महामानव अभिवादन ग्रुपचे अध्यक्ष जी.एम. भोले, के.एस. वाघमारे, आयुनि. उषा उमाजी वाघमारे, वाचाल तर वाचालचे अध्यक्ष डी.जी. वानखेडे आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कॅप्टन राजाभाऊ आठवले यांची उपस्थिती होती.शुभेच्छा देताना जी.एम. भोले सर यांनी वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च न करता अशा समाज उपयोगी कार्याकरिता ‘दान पारमिता’ पूर्ण करण्याच्या कल्पनेचे कौतुक केले. कॅप्टन राजाभाऊ आठवले यांनी शाळेची शिस्त आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या प्रयत्नांचे कौतुक केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आयु. अक्षय आठवले यांनी प्रयत्न केले, मुलांना खाऊ वाटप करण्यात आले आणि शेवटी आरती टिचर यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.


57
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!