पाथर्डी/शेवगाव: शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीने (VBA) पुकारलेल्या ‘कासार पिंपळगाव चलो’ आंदोलनाच्या इशाऱ्याचा मोठा परिणाम झाला आहे. ओला दुष्काळ जाहीर करणे आणि कर्जमाफीच्या मागणीसाठी आमदार मोनिका राजळे यांच्या निवासस्थानी ‘चटणी-भाकर’ खाऊन ‘काळी दिवाळी’ साजरी करण्याचा इशारा दिल्यानंतर, शासनाने तातडीने पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी २०८ कोटी रुपयांचा मोठा निधी मंजूर केला आहे. ’काळी दिवाळी’ आंदोलनाचा इशारा:वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील शेवगाव-पाथर्डी तालुका युनिटने (अध्यक्ष: श्रीशांत बोर्डे आणि प्यारेलाल शेख) शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मंगळवार, दिनांक २१ ऑक्टोबर २०२५ रोजी आमदार मोनिका राजळे यांच्या निवासस्थानी धडक देण्याचा इशारा दिला होता. प्रमुख मागण्या : या आंदोलनात ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार रुपये मदत, सरसकट कर्जमाफी, पोटखराबा जमिनीचा प्रश्न सोडवणे आणि कापूस खरेदी केंद्र सुरू करणे या प्रमुख मागण्या करण्यात आल्या होत्या.आंदोलनाचा परिणाम: २०८ कोटींचा निधी मंजूर. वंचित बहुजन आघाडीने केलेल्या तीव्र आंदोलनानंतर शासनाने अखेर जिल्ह्यासाठी मंजूर ८४८ कोटी रुपयांच्या निधीपैकी तब्बल २०८ कोटी रुपये पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यांसाठी मंजूर केले आहेत.आमदार मोनिका राजळे यांनी ही माहिती दिली असून, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या १ लाख ४ हजार ८४१ शेतकऱ्यांसाठी हा निधी मंजूर झाला आहे.तालुका लाभार्थी शेतकरी संख्या मंजूर झालेला निधी भरपाई दर. पाथर्डी.लाभार्थी शेतकरी संख्या,७० हजार ६४६ / आणि मंजूर झालेला निधी, रु. १०१ कोटी ५२ लाख रु, भरपाई दर प्रति हेक्टरी रु. २०,०००. शेवगाव,लाभार्थी शेतकरी संख्या ३४ हजार १९५ / आणि मंजूर झालेला निधी, १०६ कोटी ९४ लाख रु. भरपाई दर प्रति हेक्टरी रु .२०,००० दिवाळीपूर्वी ही मदत रक्कम थेट नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याने बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनामुळेच सरकारला जाग आली आणि निधी मंजूर झाला, अशी प्रतिक्रिया तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.













