पोलिस प्रशासन न्यूज.

शासकीय तंत्रनिकेतन, बीड येथे ‘भटक्या जनावरांचे व्यवस्थापन’ विषयावर जनजागृती सत्र संपन्न


बीड: (प्रतिनिधी)

मानव आणि भटक्या श्वानांमधील वाढता संघर्ष टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शासकीय तंत्रनिकेतन, बीड येथे ‘भटक्या जनावरांचे व्यवस्थापन व मानव-श्वान संघर्ष निवारण’ या विषयावर विशेष जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले होते. माननीय सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या सूचनांनुसार हे सत्र पार पडले.

​या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. ए. के. वाघमारे यांनी भूषवले, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून बीडचे पशुधन विकास अधिकारी डॉ. थोरात एस. जी. आणि नाळवंडी येथील पशुधन पर्यवेक्षक डॉ. तंबारे बी. आर. उपस्थित होते.

​तज्ज्ञांचे मार्गदर्शन: उघड्यावर अन्न टाकणे टाळा

​मार्गदर्शन करताना डॉ. थोरात यांनी सांगितले की, “परिसरात उघड्यावर अन्न टाकल्यामुळे भटक्या श्वानांचा वावर वाढतो आणि त्यांच्यात आक्रमकता निर्माण होते.” श्वान चावल्यास घाबरून न जाता तातडीने जखम स्वच्छ धुवावी आणि रेबीज प्रतिबंधक लसीकरण वेळेत पूर्ण करावे, याबद्दल त्यांनी सविस्तर तांत्रिक माहिती दिली.

​संस्था परिसर श्वानमुक्त करण्यासाठी विशेष पाऊल

​अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. ए. के. वाघमारे यांनी स्पष्ट केले की, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षितता ही संस्थेची प्राथमिकता आहे. त्यानुसार संस्थेने श्री. राहुल सी. आठवले यांची ‘नोडल अधिकारी’ म्हणून नियुक्ती केली असून, संस्था परिसर श्वानमुक्त करण्यासाठी कठोर पावले उचलली जात असल्याचे त्यांनी सांगितले. नोडल अधिकारी राहुल आठवले यांनी राबवल्या जाणाऱ्या विविध उपाययोजनांची माहिती दिली.

​सर्व घटकांची उपस्थिती

​या सत्रासाठी सर्व विभागप्रमुख, अधिव्याख्याते, शिक्षकेतर कर्मचारी, सुरक्षा रक्षक, सफाई कामगार आणि मेस-कॅन्टीनमधील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. वडगावकर पी. बी., श्री. राजूरकर व्ही. एल. व शेख अनिस शेख अख्तर यांनी विशेष परिश्रम घेतले.


*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

77
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

error: Content is protected !!