पोलिस प्रशासन न्यूज.

शिवाजी पार्कवर ‘संविधान सन्मान महासभेला उसळला जनसागर; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा भाजप-आरएसएसवर सणसणीत प्रहार,


मुंबई, (लाईव्ह अशोका टाईम्स)  : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी काल (दि. २५ नोव्हेंबर) मुंबईच्या ऐतिहासिक छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर आयोजित ‘संविधान सन्मान महासभेत’ भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) अत्यंत कठोर आणि थेट शब्दात हल्ला चढवला. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखों संविधानप्रेमींच्या साक्षीने, ॲड. आंबेडकरांनी धार्मिक ध्रुवीकरण, आंतरराष्ट्रीय संबंधातील एकाकीपणा आणि लोकशाहीला असलेला धोका यांवर जोरदार प्रहार केला.

​’मोहन भागवत, तुमचा आदर्श हिटलर-मुसोलिनी आहेत का?’

​ॲड. आंबेडकरांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना थेट प्रश्न विचारत आरएसएसच्या वैचारिक मुळांवर बोट ठेवले. ते म्हणाले, “ऐतिहासिक नोंदीनुसार, १९३० च्या दशकात आरएसएसचे कार्यकर्ते हिटलर आणि मुसोलिनी यांना भेटले होते. मग मोहन भागवत यांनी सांगावे, तुमचा आदर्श हिटलर आहे की मुसोलिनीचा मार्ग तुम्हाला मान्य आहे?” नोंदणी नसलेल्या आरएसएस संघटनेला सरकारी सुरक्षा का, असा सवालही त्यांनी केला.

​धर्माधारित राष्ट्र अस्थिर, मतपेटीतून राजा निवडण्याचे आवाहन

​धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्या शक्तींवर टीका करताना, त्यांनी पाकिस्तानचे उदाहरण देत स्पष्ट केले, “समता, स्वातंत्र्य आणि बंधुता हीच राष्ट्राला एकत्र ठेवण्याची मूलतत्त्वे आहेत.” त्यांनी भाजपवर एकपक्षीय व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. जनतेला आवाहन करताना ते म्हणाले, “जे संविधानवादी आहेत, तेच खरे राष्ट्रवादी आहेत. तुमची उपस्थिती मतपेटीत उतरली, तर लोकशाहीची दिशा बदलू शकते. राजा मतपेटीतून ठरतो.”

​महाभेतील प्रमुख मान्यवर आणि नेत्यांची उपस्थिती

​या संविधान सन्मान महासभेला विविध क्षेत्रातील मान्यवरांची भव्य उपस्थिती लाभली. बंगलोर येथील जगद्गुरू चन्नबसवानंद महास्वामी, शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मातोश्री विजयाबाई सूर्यवंशी, बुलढाण्यातील भन्ते राजज्योती, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य मौलाना डॉ. अब्दुर रशीद मदणी आणि पंढरपूर येथील ह.भ.प. श्री. ज्ञानेश्वर बंडगर महाराज हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

​यासोबतच, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर, युवा नेते सुजात आंबेडकर, आणि वंचित बहुजन आघाडीच्या केंद्रीय कार्यकारिणीतील सदस्य अशोक भाऊ सोनोने, दिशा शेख, अरुंधती शिरसाट, ऍड. प्रियदर्शी तेलंग, महेश भारतीय, डॉ. अरुण सावंत आणि प्रा. किसन चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

​राज्य स्तरावर रेखाताई ठाकूर, डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, फारुख अहमद, डॉ. अनिल जाधव, सर्वजित बनसोडे, सिद्धार्थ मोकळे, अमित भुईगल, राजेंद्र पातोडे आणि अविनाश भोसीकर यांनी हजेरी लावली. राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रुपवते, तय्यब जफर तसेच मुंबई प्रदेशाध्यक्ष चेतन अहिरे, मुंबई महिला आघाडी अध्यक्षा स्नेहल सोहनी आणि मुंबई युवा आघाडी अध्यक्ष सागर गवई यांच्या उपस्थितीने सभेला अधिक भव्यता प्राप्त झाली.


*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

77
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

error: Content is protected !!