जालना प्रतिनिधी(रामकिसनअवधूत): कलिंगच्या भीषण युद्धानंतर तलवारीचा त्याग करून शांतीचा मार्ग स्वीकारणारा हा जगाच्या इतिहासातील एकमेव सम्राट. तथागत गौतम बुद्धांच्या विचारांनी त्यांनी केवळ भूभाग जिंकण्यापेक्षा मानवांची मने जिंकण्याला प्राधान्य दिले. आजच्या हिंसाचार आणि अशांततेच्या काळात, त्यांचे करुणा आणि अहिंसेचे विचार अधिकच सुसंगत ठरतात. समता, बंधुता आणि लोककल्याणाचा आदर्श जपणाऱ्या सम्राट अशोक यांच्या जयंती निमित्त महाप्रजापती बौद्ध विहार जयनगर जालना येथे दिनांक २६ मार्च २०२६ रोजी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष तथा डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष दिपक डोके यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सम्राट अशोक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली याप्रसंगी सचिव:विलास दाभाडे, सिध्दार्थ इंगळे, सिध्दार्थ पाईकराव,एन.एम.झिने, अण्णा गाडगे, साळवे सर,सातदिवे सर,एस जे. सुकधाने, सुनील गंगावणे यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.














