पोलिस प्रशासन न्यूज.

राज्यस्तरीय तिरंदाजी स्पर्धेत वेदांत चव्हाण यांचे यश,केजच्या विद्यार्थ्यांचा बहुमान


केज/प्रतिनिधी

मध्यप्रदेश अमॅच्युअर आर्चरी असोसिएशन यांच्या वतीने दि.१० ते ११ जानेवारी २०२६ रोजी सिंगरौली येथे आयोजित १६ वी मिनी पंधरा वर्षांखालील व बाल तेरा वर्षांखालील व दहा वर्षांखालील राज्यस्तरीय तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात पार पडली.या स्पर्धेत सागर जिल्ह्याचे उदयोन्मुख तिरंदाज वेदांत विष्णू चव्हाण जन्मतारीख १९ जुलै २०१६ याने उत्कृष्ट कामगिरी करत तृतीय क्रमांक पटकावला. इंडियन राउंड/रिकर्व्ह/कंपाऊंड प्रकारात वेदांत यांनी अचूक नेम साधत पदकाची कमाई केली.

स्पर्धेनंतर पारितोषिक वितरण समारंभात वेदांत यांना प्रमाणपत्र व पदक प्रदान करण्यात आले. त्यांच्या या यशाबद्दल कुटुंबीय,प्रशिक्षक व क्रीडाप्रेमींनी अभिनंदनाचा वर्षाव केला असून भविष्यातील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.वेदांत हा केज येथील डॉ.सुरेश बिक्कड यांचा नातु आहे.


*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

77
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

error: Content is protected !!