पोलिस प्रशासन न्यूज.

घुंगर्डे हादगाव येथे राजेश टोपे यांच्या वाढदिवसानिमित्त विज्ञान व गणित मेळावा


अंबग.रामकिसन अवधूत. प्रतिनिधी :महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय राजेश भैय्या टोपे साहेबांच्या वाढदिवसानिमित मत्स्योदरी विद्यालय घुंगर्डे हदगाव तालुका अंबड येथे भव्य अपूर्व विज्ञान व गणित मेळाव्याचे आयोजन दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी करण्यात येणार असून,सदरील मेळाव्याचे उद्घाटन तहसीलदार विजय चव्हाण यांच्या हस्ते होणार असून,कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री आदरणीय राजेश टोपे साहेब असणार आहेत..प्रसंगी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडणार आहे..

या विज्ञान व गणित प्रदर्शनात विद्यालयातील विद्यार्थ्यांचे 200 पेक्षा जास्त प्रोजेक्ट चे सादरीकरण होणार आहे..ग्रामीण भागातील हे पहिलेच विज्ञान व गणित प्रदर्शन असल्यामुळे पंचक्रोशीतील. नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

सदरील प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी विज्ञान व गणित शिक्षकासहीत सर्वच शिक्षक मेहनत घेत आहेत..तरी आपण या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन मुख्याध्यापक कल्याण सोळुंके यांनी केले आहे..


78
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!