सुखापूरी .प्रतिनिधी(रामकिसन अवधूत): भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत अंबड तालुक्यातील सुखापूरी येथेल बसस्थानक परिसरात पत्रकार संघाच्या वतीने पाणपोईचे आयोजन करण्यात आले.या उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांना दिलासा देण्याचा स्तुत्य प्रयत्न करण्यात आला.
उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याची मोठी अडचण भासत असताना, पत्रकार संघाने पुढाकार घेत रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या प्रवासी,नागरिक व वाहनचालकांसाठी थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली.या पाणपोईला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या उपक्रमाचे उद्घाटन सुखापूरी सरपंच भगवानराव राखुंडे, लखमापूरी सरपंच ज्ञानेश्वर तारगे, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र काळे,अशोक बोटे,अनिल कांबळे,किशोर कांबळे,आबा चांगले,मदन राखुंडे,रामकिसन अवधुत, फकिर महमद,राजेंद्र गायकवाड,राजेंद्र मोतळे विक्रम तांदळे प्रदिप भापकर मधूकर कासार अंकुश गुडेकर आदी मान्यवरांनी सक्रिय सहभाग घेतला.त्यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.
यावेळी उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना उजाळा देत समाजसेवेची प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.“मानवतेची सेवा हीच खरी जयंती साजरी करण्याची पद्धत आहे,”असे मतही व्यक्त करण्यात आले.
या उपक्रमामुळे सुखापूरी परिसरात सामाजिक एकोपा आणि सेवाभावाचे उत्तम उदाहरण पाहायला मिळाले













