पोलिस प्रशासन न्यूज.

फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरण: ॲड. प्रकाश आंबेडकर यांची SIT चौकशीची मागणी; मुख्यमंत्र्यांनी खासदाराला ‘क्लीनचिट’ दिल्याचा गंभीर आरोप


सातारा: फलटण येथील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येच्या प्रकरणाचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटत असून, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या घटनेबद्दल संताप व्यक्त केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर स्पष्टीकरण द्यावे, तसेच या संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत (SIT) चौकशी करावी, अशी जोरदार मागणी केली आहे. त्यांनी ‘एक्स’ (X) हँडलवरून ट्विट करत आपली भूमिका मांडली. माजी खासदाराच्या पीएवर दबाव टाकल्याचा आरोप.ॲड. आंबेडकरांनी फलटण येथील या घटनेला ‘अत्यंत चीड आणणारी घटना’ असे म्हटले आहे.या प्रकरणात माजी खासदाराच्या पीएने डॉक्टर तरुणीवर दबाव टाकला होता, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.मुख्यमंत्र्यांवर ‘क्लीनचिट’ दिल्याचा आरोप

​                                                                        ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट टीका केली आहे. संबंधित खासदाराला मुख्यमंत्र्यांनी क्लिनचिट दिल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांवर दोन थेट प्रश्न उपस्थित केले आहेत: खासदारांच्या पीएने डॉक्टर तरुणीला फोन केला होता की नाही?ते (देवेंद्र फडणवीस) स्टेटमेंट करण्याआधी मोबाईलचा रेकॉर्ड चेक केला होता का? पीडित कुटुंबाची मागणी आणि आंबेडकरांचे समर्थन ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मृत डॉक्टर तरुणीच्या कुटुंबीयांशी फोनवर संपर्क साधून त्यांचे सांत्वन केले. पीडित कुटुंबाने या प्रकरणी SIT चौकशीची मागणी केली असून, वंचित बहुजन आघाडीचेही या मागणीला पूर्ण समर्थन असल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे. पूर्वीच्या प्रकरणाचाही उल्लेख: यादरम्यान, त्यांनी यापूर्वीच्या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाचा उल्लेख                       केला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सभागृहात खोटी माहिती दिली, मात्र कोणत्याही विरोधी पक्षाने त्यावर हक्कभंगाचा ठराव आणला नाही, याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.


*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

77
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

error: Content is protected !!