केज/प्रतिनिधी
कोट्यवधी लोकांच्या मना वर अधिराज्य गाजवणारे महान शास्त्रज्ञ,भारताला अण्वस्त्रसज्ज राष्ट्र बनवण्यात मोलाची भूमिका असणारे माजी राष्ट्रपती म्हणजे भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त व दि. ३ जानेवारी सावित्री बाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधत घेतलेल्या सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे बक्षीस वाटप करण्यात आले.शिक्षण क्षेत्रात क्रांतीची ज्योत पेटून मुलींची पहिली शाळा सुरू केली ती साऊ शिक्षण चळवळीत ज्याचे अनंत असे योगदान आहे. मुलगा जेवढा महत्त्वाचा आहे तेवढीच मुलगी देखील या दुव्याच मूळ नष्ट करणाऱ्या,आज मुली ज्या यशोशिखरावर आहेत ती साऊची देणगी आहे आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करणारी साऊची लेक आहे.ज्योतीबा फुले यांनी साऊला सोबत घेऊन १८४८ साली भारतात मुलींसाठी शाळा सुरू केली आजदेखील महिला सामाजिक,आर्थिक, राजकीय क्षेत्रात कार्यरत आणि सक्षम आहेत ती साऊची देण आहे,साऊ ने काय दिले शिक्षण, आत्मविश्वास,ध्यास, सन्मान दिला आजप्रत्येक क्षेत्रात शिक्षण घेऊन काम करण्याची क्षमता दिली. साऊ ही अंधाराला जाळीत जाणारी पेटती मशाल आहे असे विद्याताई तारळकर यांनी यावेळी बोलताना आपले विचार व्यक्त केले.यावेळी
हस्ताक्षर स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांची निवड करण्यात आली यामध्ये
प्रथम क्रमांक ओवी निलेश तारळकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरगाव (बु),द्वितीय क्रमांक तनिष्का शिवाजी तारळकर संत तुकाराम इंग्लिश स्कूल लातूर, यशश्री बालाजी सामसे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदूर घाट,तृतीय क्रमांक राधिका नितीन चांगण लोकनेते गोपीनाथ मुंडे विद्यालय नांदूर घाट या सहभागी विध्यार्थी याना एक वही म्हणून बक्षिस दिले.बक्षीस वितरण कार्यक्रमास अध्यक्ष पदावर विद्याताई तारळकर तर प्रमुखपाहुणे म्हणून बबन दावडकर, अनिल तारळकर,निलेश तारळकर सर,ज्योतिराम तारळकर,संतोष तारळकर आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी अध्यक्षीय समारोप करताना विद्याताई तारळकर यांनी सांगितले की,गल्ली पासून गावा पर्यंत वाचन संस्कृतीची आवड व्हावी म्हणून लहाना पासून ते मोठ्यां पर्यंत वाचन संस्कृती जपली गेली पाहिजे म्हणून हा सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालयाचा प्रयत्न असेल,पुस्तक ही आपला चांगला मित्र,दोस्त,सखा, होऊ शकतो आणि या पुस्तकावरही आपण प्रेम करू शकतो हे देखील केकवेळा सिद्ध झालेले आहे.ज्यांनी विद्यार्थ्यांना वाचनसंस्कृती प्रिय व्हावी म्हणून मार्गदर्शन करणारे, मोबाईल – इंटरनेटच्या जगात वाचन संस्कृती टिकली पाहिजे व बाल वाचकां पासून ते तरुण वर्गापर्यंत वाचन वर्ग तयार करू अशी वाचन संस्कृतीची क्रांती घडवून आणू ते लगेच शक्य नाही पण काही दिवसात पूर्ण होईल हा विश्वास आहे. आदर्श घेऊन पुढे चालू ठेवला जाईल असे त्यांनी सांगितले.आभार प्रदर्शनाने कार्यक्रम संपन्न झाला.














