उपोषणाचा चौथा दिवस, तरीही प्रशासन गप्प
केज:प्रतिनिधी
केज नगरपंचायत अंतर्गत सन २०१५ ते १० मार्च २०२६ या कालावधीत राबविण्यात आलेल्या विविध विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत, संबंधित प्रकरणांची सखोल चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करावी या मागणीसाठी केज नगरपंचायत कार्यालयासमोर शेकाप नेते भाई मोहन गुंड यांनी 4 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. दि. २७ मार्च रोजी सकाळी ११ वाजल्यापासून सुरू झालेले हे आंदोलन आता चौथ्या दिवशी प्रशासनान पोहोचले नाही अद्याप प्रशासनाकडून कोणती ही ठोस कार्यवाही न झाल्याने आंदोलनक गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. आंदोलनकर्त्यांच्या मते, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत (२०१८-१९) पात्र लाभार्थ्यांच्या सुमारे ३ कोटी ६२ लाख रुपयांचा अपहार झाल्याचा गंभीर आरोप आहे. ही रक्कम संबंधित लाभार्थ्यांना परत मिळवून देण्यात यावी किंवा त्यांना घरकुल उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच घरकुल घोटाळ्यातील दोषींवर कडक कारवाई करून अपहाराची रक्कम वसूल करावी, अशी ही मागणी आहे.
या शिवाय, दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत मंजूर निधीचा वापर, विविध रस्ते कामांसाठी मंजूर झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचा झालेला वापर, तसेच प्रत्यक्ष काम न करता बिल उचलल्याचे आरोप यांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. फुलेनगर रस्ता, मंगळवार पेठ ते आंबेडकर चौक रस्ता यांसारख्या कामांच्या गुणवत्तेची तपासणी करून दोषींवर कारवाई करावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तसेच, २०१९ ते मार्च २०२६ या कालावधीत नगरपंचायतीच्या जनरल खात्यातून झालेल्या खर्चाचा तपशील जाहीर करावा, वाईन शॉपसाठी दिलेल्या ना हरकत प्रमाणपत्राबाबत चौकशी करावी, तसेच जिल्हा परिषद शाळेची जागा हस्तांतरणाचा ठराव रद्द करावा, अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.या सोबतच गायराण धारकांना मालकी हक्क पत्र वाटप करणे, शेतकऱ्यांना ग्रामीण योजनांचा लाभ देणे, दिव्यांगांना ५ टक्के निधी देणे यांसारख्या जनहिताच्या मागण्यांचाही समावेश आहे.
दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जर त्यांच्या मागण्या तात्काळ मान्य करण्यात आल्या नाहीत, तर केज शहरातील नागरिकांच्या वतीने बुधवारी 10 वाजता मंगळवार पेठ संभाजीराजे चौक येथे बे मुदत रस्ता रोको करण्यात येईल. त्यामुळे केज शहरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून, जिल्हाधिकारी यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे. आंदोलनाला सर्व सामान्य लोक पक्ष संघटनेचा पदाधिकारी उपस्थित पाठींबा देत आहेत.













