पोलिस प्रशासन न्यूज.

एम.सी.एक्स मार्फत शासकीय आय.टी.आय कॉलेज परळी वैजनाथ येथे स्मार्ट निवेशक जागरूकता कार्यक्रम संपन्न.


बीड/प्रतिनिधी : दि.५ जानेवारी २०२६ रोजी परळी वैजनाथ येथे लोकनेते गोपीनाथराव मुंडे शासकीय आय.टी. आय कॉलेज परळी वैजनाथ येथे भारत सरकारच्या भारतीय प्रतिभूती व विनिमय बोर्ड अर्थात (सेबी) तसेच एम. सी.एक्स च्या माध्यमातून आय.टी.आय च्या विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय स्मार्ट निवेशक जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य श्री.एस. एस.लोखंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून(सेबी) तसेच एम.सी.एक्स चे सेक्युरिटीज मार्केट ट्रेनर श्री.गणेश चौधरी सर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आर्थिक नियोजनाचे मार्गदर्शन केले.यात त्यांनी विद्यार्थ्यांना फायनान्शियल मार्केट्स, कमोडिटीचे प्रकार, जागतिक स्तरावर सक्रिय असलेल्या कमोडिटीज, वेअर हाऊसिंग डेव्हलपमेंट रेग्युलेशन ॲक्ट,कमोडिटी व इक्विटी मध्ये असेल असलेला फरक,डिमॅट अकाउंट,तसेच सेबीच्या सारथी ॲप चे महत्त्व विषद करत मार्गदर्शन केले.तसेच गुंतवणूक करत असताना विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यावी व फसवणूक करणाऱ्या योजनांपासून सावध राहण्याच्या सूचना दिल्या.हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्री. बाळासाहेब नवसुपे सर यांनी विशेष प्रयत्न करत सूत्रसंचालन केले तसेच या कार्यक्रमास शिल्पनिषक व प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

77
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

error: Content is protected !!