पोलिस प्रशासन न्यूज.

माता रमाई जयंतीनिमित्त निबंध स्पर्धेत राजलक्ष्मी जाधव प्रथम


माऊंट लिटरा झी स्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थिनीचा सन्मान

परळी वैजनाथ (प्रतिनिधी):

माता रमाई आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरी शालेय व महाविद्यालयीन निबंध स्पर्धेत माऊंट लिटरा झी स्कूल, परळी येथील विद्यार्थिनी राजलक्ष्मी विकास जाधव हिने प्रथम क्रमांक पटकावून शाळेचा नावलौकिक वाढविला आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल राजलक्ष्मी जाधव हिचा माऊंट लिटरा झी स्कूल, परळी येथे विशेष सत्कार समारंभ आयोजित करून गौरव करण्यात आला. यावेळी संस्थेचे संचालक कैलास घुगे, शाळेचे प्राचार्य मंगेश काशीद, तसेच सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

या प्रसंगी राजलक्ष्मी जाधव हिला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल ५,००० रुपयांचे रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी तिच्या यशाबद्दल अभिनंदन करत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

राजलक्ष्मी जाधव हिने आपल्या निबंधातून मासाहेब जिजाऊ यांच्या शौर्यगाथा व कथा त्याग, संघर्ष व सामाजिक योगदानाचे प्रभावी मांडणी केली असून, तिच्या विचारशील लेखनशैलीचे परीक्षकांकडून विशेष कौतुक करण्यात आले.

या यशामुळे माऊंट लिटरा झी स्कूल, परळी येथील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व स्पर्धात्मक गुणवत्तेचा प्रत्यय पुन्हा एकदा आला असून, शाळेच्या शिक्षकवृंदाने समाधान व्यक्त केले आहे.


*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

77
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

error: Content is protected !!