पोलिस प्रशासन न्यूज.

माहिती अधिकार फेडरेशनच्या बीड जिल्हा अध्यक्षपदी अजय भांगे यांची पुन्हा निवड ​


केज,(लाईव्ह अशोका टाईम्स) :=माहिती अधिकार फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांच्या आदेशाने तसेच कार्यवाह शेखर कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली, बीड जिल्ह्याच्या माहिती अधिकार फेडरेशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली. या निवडणुकीत, दैनिक ‘वादाळ वार्ता’चे संपादक तथा सामाजिक कार्यकर्ते अजय भांगे यांची पुन्हा एकदा बीड जिल्हा अध्यक्षपदी एकमताने फेरनिवड करण्यात आली आहे.

​माजी कार्याकाळातील भांगे यांचे कार्य अत्यंत उल्लेखनीय राहिले आहे. त्यांनी गेल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात माहिती अधिकाराच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रशासनातील पारदर्शकता वाढवण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या सक्षम नेतृत्वाखाली शेकडो तरुणांना ‘आरटीआय’ (RTI) बाबत मार्गदर्शन मिळाले असून, अनेक प्रकरणात त्यांनी यशस्वी काम केले आहे.

​माहिती अधिकार फेडरेशनचे अजय भांगे हे जनहितासाठी नेहमीच सक्रियपणे उभे राहिले आहेत. त्यांनी माहिती अधिकार कार्यकर्त्यांचे एक सशक्त जाळे उभे करून फेडरेशनची ताकद वाढवली आहे.

​फेरनिवडीनंतर अजय भांगे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, “माहिती अधिकार हा लोकशाहीतील सामान्य नागरिकांचा प्रभावी हक्क आहे.”

​प्रशासनातील अनियमितता दूर करण्यासाठी आणि सामान्य नागरिकांपर्यंत माहितीचा हक्क पोहोचवण्यासाठी त्यांचे कार्य यापुढेही सुरूच राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.


*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

77
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

error: Content is protected !!