पोलिस प्रशासन न्यूज.

अकोला येथे १९ जुलै रोजी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन पत्रकार संघाच्या राज्यस्तरीय अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे – प्रदेश संपर्क प्रमुख वैभव स्वामी


बीड/प्रतिनिधी

 

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती यांच्या वतीने रविवार,दि.१९ जुलै २०२६ रोजी सकाळी १०-०० ते सायंकाळी ७-०० या वेळेत हॉटेल कृष्णा इम्पिरियल,नवीन बसस्थानकाजवळ, अकोला येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. राज्यभरातील पत्रकार, संपादक,वृत्तनिवेदक, छायाचित्रकार व माध्यम क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हे अधिवेशन होणार असून यामध्ये पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर मंथन केले जाणार आहे.पत्रकार संघाच्या या महत्त्वपूर्ण राज्यस्तरीय अधिवेशनाला राज्यभरातील पदाधिकारी,सदस्य, पत्रकार,पत्रकार प्रेमी नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पत्रकार संघाचे प्रदेश संपर्कप्रमुख वैभव स्वामी यांनी केले आहे.

अधिवेशनाचे उद्घाटन महाराष्ट्राचे कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री मा.आकाश फुंडकर यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मा.निलेश सोमाणी राहणार आहेत.प्रमुख पाहुणे म्हणून मा.न्यायमूर्ती शंभ्रलाल मेश्राम (माजी न्यायाधीश, मुंबई),श्री संजय भोकरे प्रदेश संघटक,श्री.डॉ. विश्वासराव आरोटे प्रदेश सरचिटणीस, खासदार मा.अनूपजी धोत्रे,आमदार डॉ. विश्वासराव आत्रे, आमदार रणधीर सावरकर,आमदार संजय भोकरे,आमदार साजिद खान पठाण, आमदार वसंत खंडेलवाल,आमदार नितीन देशमुख, आमदार हरीश पिंपळे हे उपस्थित राहणार आहेत.तर कार्यक्रमात प्रमुखउपस्थिती म्हणून माजी आमदार नारायणराव गव्हाणकर,माजी आमदार डॉ.संतोष हुशे,माजी आमदार बळीरामजी सिरसकर, जिल्हाध्यक्ष प्रकाश तायडे(राष्ट्रीय काँग्रेस), संचालक सदाफराजी लांडे (महाराष्ट्र बाजार समिती सहकारी संघ, पुणे),जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण अंधारे (राकाँ.,अकोला)तसेच लोकसभा समन्वयक संदीपदादा पाटील हे उपस्थित राहणार आहेत.दुपारी आयोजित परिसंवादात पत्रकारांवरील होत असलेले हल्ले व शिस्तभंगाच्या कारवाई या महत्त्वाच्या विषयावर ज्येष्ठपत्रकार तथा राजकीय विश्लेषक मा.निरंजन टकले,मुक्त पत्रकार व एबीपी माझाचे संपादक मा.हिना कोसर,दैनिक देशोन्नती चे मुख्य संपादक मा. प्रकाश पोहरे,पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे प्रदेशाध्यक्ष मा.गोविंद वाकडे, एएनएन न्यूजचे संपादक मा.निलेश धांडे,प्रदेश महासचिव मा.राजेंद्र पाटोळे यांच्यासह अन्य मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.

सकाळच्या पुरस्कार सोहळ्याचे उद्घाटन पोलीस अधीक्षक मा. अर्चित चांडक यांच्या हस्ते होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ प्रमुख मा.नयन मुंढे राहणार असून प्रमुख उपस्थितीमध्ये प्रदेश प्रसिद्धी प्रमुख मा. नवनाथ जाधव,राज्य उपाध्यक्ष मा.प्रा.महेश पानसे,प्रदेश उपाध्यक्ष मा.किशोर रायसाकडा प्रदेश संपर्क प्रमुख मा. वैभव स्वामी,मुख्य संपादक मा. मधुकरराव बावणे, विदर्भ अध्यक्षा श्रीमती अलका पचारे,प्रदेश संपर्क प्रमुख मा.अनुप भार्गव,माजी आमदार मा.हरिदास भदे आणि ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मा.गजानन वाघमारे उपस्थित राहणार आहेत.यावेळी पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्या बद्दल मा.धनंजय सावळे (आज तक)- कृषी पत्रकारिता,मा. हर्षवर्धन सोनोने (प्रहार २४ तास)-डिजिटल पत्रकारिता,मा.जयेश जगड (झी न्यूज मराठी) -युद्धवार्ता पत्रकारिता,मा.उमेश अलोने (एबीपी माझा) – प्रेरणादायी पत्रकारिता,मा.योगेश फरफट (दै.सकाळ) – आरोग्य पत्रकारिता, मा.अमोल नांदुरकर (लोकशाही न्यूज) – तिसरा डोळा पत्रकारिता तसेच मा. सतीश देशमुख, मा. औरंगजेब हुसेन,मा. विवेक गर्वड आणि मा. इरफान अहमद शेख यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.याशिवाय जीवन गौरव पुरस्कार मा. मनोज पोटले,जीवन संगम पुरस्कार मा. शौकतअली मिर, विवेकवादी पत्रकारिता पुरस्कार मा.देविदास चव्हाण आणि दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार मा. गोपाळकृष्ण गुजराथी यांना प्रदान करण्यात येणार आहेत.या राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन अकोला जिल्हाध्यक्ष श्री.गणेश नथुजी सुरजुसे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले असून देवानंद गहिले (पातूर),प्रदीप गावंडे (बार्शीटाकळी), संजय उमक (मूर्तीजापूर) आणि सम्राट वानखडे (बाळापूर) हे तालुकाध्यक्ष आयोजनात सक्रिय सहभाग घेत आहेत. तरी राज्यभरातील पत्रकारांनी या अधिवेशनास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई च्या वतीने प्रदेश संपर्कप्रमुख वैभव स्वामी यांनी केले आहे.


84
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!