पोलिस प्रशासन न्यूज.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ केज महिला तालुकाध्यक्षपदी ज्योतीताई पाटील; नवीन कार्यकारिणी जाहीर


केज | प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईच्या केज तालुका महिला शाखेची नवनियुक्त कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये तालुकाध्यक्ष पदावर सौ. ज्योतीताई पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून, उपाध्यक्षपदी सौ. स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ. वैशालीताई कराड यांची नियुक्ती झाली आहे.

​तालुक्यातील महिला पत्रकारांच्या संघटन बांधणीसाठी आणि त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश संघटक संजयजी भोकरे, प्रदेशाध्यक्ष गोविंदजी वाकडे, प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे आणि महिला जिल्हाध्यक्षा आयेशा शेख यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. केज येथे प्रदेश संपर्क प्रमुख वैभवजी स्वामी व जिल्हाध्यक्षा आयेशा शेख यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली.

​नूतन कार्यकारिणी खालीलप्रमाणे:

​तालुकाध्यक्ष: सौ. ज्योतीताई पाटील

​उपाध्यक्ष: सौ. स्वातीताई कसबे

​सचिव: सौ. वैशालीताई कराड

​कोषाध्यक्ष: सौ. धनश्रीताई मिटकरी

​कार्याध्यक्ष: सौ. प्रेमलाताई मिसाळ

​कायदेशीर सल्लागार: अ‍ॅड. स्नेहल पाटील

​सदर कार्यकारिणीचा कार्यकाळ १२ जानेवारी २०२६ पासून ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत असणार आहे. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी पत्रकारिता करताना संघटनेची शिस्त, नियमावली आणि सामाजिक बांधीलकी जपत कार्य करावे, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

​या निवडीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. निवडीच्या वेळी केज तालुकाध्यक्ष चंद्रकांत पाटील, कार्याध्यक्ष नंदुलाल मिसाळ, सदस्य हिराचंद काळे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.


78
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!