पोलिस प्रशासन न्यूज.

महाराष्ट्र नायक राज्यस्तरीय पुरस्काराने बाबासाहेब शेळके व त्यांची पत्नी सविता शेळके यांचा गौरव


अंबड,(रामकिसन अवधूत)प्रतिनिधी :=

बीएसएफ बहुउद्देशीय संस्था अमरावती अपेक्षित नायक न्यूज संत कबीर बहुद्देशीय संस्था बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा महाराष्ट्र नायक राज्यस्तरीय २०२६ हा पुरस्कार अंबड तालुक्यातील येथील सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब राधाकिसन शेळके व त्यांची पत्नी सामाजिक कार्यकर्त्या सविता बाबासाहेब शेळके यांना प्रदान करण्यात आला. प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्या हस्ते बाबासाहेब शेळके व त्यांच्या पत्नी सविता शेळके यांना शुभ हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 

हा पुरस्कार सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांची या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड करण्यात आली रविवारी ३१ रोजी नाशिक येथील निलगिरी बाग परिसरातील धनलक्ष्मी गार्डन बँक वेट हॉल येथे आयोजित भव्य समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अपेक्षित नायक न्यूज व कार्यक्रमाचे अध्यक्ष भूषण निळकंठ सरदार हिंदू मंजूर संघ महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष कार्तिक अर्जुन डांगे, डॉ.रावसाहेब घोडेराव, वैशाली माधवराव सोनवणे, अशोकराव सदाशिव पाटील नांगरे,रितिका सोळुंके, माजी ग्रहपाल लीलावती भावराव कापडणीस या कार्यक्रमाला आदी उपस्थित होते.

 

 

सामाजिक बांधिलकी जपत ग्रामीण भागात विविध उपक्रमाच्या माध्यमातून समाजप्रबोधन जनजागृती व सामाजिक कार्यात सक्रिय योगदान दिल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब शेळके व त्यांच्या पत्नी सविता शेळके यांच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या कार्यक्रमांमध्ये विशेष बाबासाहेब शेळके व सविता शेळके यांच्या घनदाट वृक्ष लागवडीची चित्रफीत दाखवून सर्व मान्यवरांचे लक्ष वेधले. या पुरस्काराबद्दल त्यांच्यावर डोमेगाव व परिसरातील विविध स्तरातून अभिनंदन वर्षाव होत आहे पुरस्कार स्वीकारते वेळी त्यांची पत्नी सविता शेळके व चिरंजीव अभिषेक शेळके उपस्थित होते.


80
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!