पुणे := पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने कोथरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन मुलींवर झालेल्या शारीरिक हिंसाचार प्रकरणी एक महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. पोलिसांनी या गंभीर प्रकरणात गुन्हा दाखल न केल्याबद्दल न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली असून, आता थेट संबंधित पोलिसांवरच गुन्हा दाखल करून तपास करण्याचे निर्देश दिले आहेत.
कोर्टाचे कठोर पाऊल
हा विषय लक्षात घेता, पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष निर्देश दिले आहेत. या प्रकरणाचा तपास आता सहायक पोलीस आयुक्त (ACP) दर्जाच्या अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आला आहे, ज्यामुळे तपासात अधिक गांभीर्य आणि निष्पक्षता येईल अशी अपेक्षा आहे.
वंचित बहुजन आघाडीचा संघर्ष,
पोलिसांवर कायदेशीर कारवाई व्हावी आणि गुन्हे दाखल व्हावेत या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने सातत्याने संघर्ष केला. ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली २८ ऑगस्ट २०२५ रोजी या प्रकरणी ऑनलाईन रीट याचिका दाखल करण्यात आली होती. वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनानंतर अखेर न्यायालयाने ही महत्त्वपूर्ण दखल घेतली आहे.या प्रकरणात पोलीस आता न्यायालयाच्या आदेशानुसार काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.












