पोलिस प्रशासन न्यूज.

कोल्हेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेंचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न


केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील कोल्हेवाडी अंतर्गत येणाऱ्या तिन्ही जिल्हा परिषद शाळांचे संयुक्त असे वार्षिक स्नेहसंमेलन शुक्रवार दिनांक १३ फेब्रुवारी २०२६ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले.या वार्षिक स्नेह संमेलनात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोल्हेवाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिसाळ वस्ती, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डांगेवस्ती या तिन्ही शाळा सहभागी झाल्या होत्या.कोल्हेवाडी येथे जिल्हा परिषद शाळांचे वार्षिक स्नेह संमेलन प्रथमच आयोजीत करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री. राधाकिसन कांबळे साहेब,केंद्रप्रमुख लहुरी तसेच कोल्हेवाडीचे ग्राम पंचायत अधिकारी शंकर हेडगिरे हे उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान गावच्या प्रथम नागरिक सौ.प्रेमाला नंदुलाल मिसाळ यांनी भूषवले.बाल कलाकारां च्या या सांस्कृतिक कार्यक्रमाला पंचक्रोशीतील लहान, थोर,महिला व पुरुष मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.बाल कलाकारांचे कलागुण पाहून ग्रामस्थांनी बक्षीसाचा व कौतुकांचा वर्षाव करत कार्यक्रमाची शोभा वाढवली. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी तिन्ही जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक वृंद,गावच्या सरपंच व विद्यार्थी, पालक अशा सर्वांनी मोलाचे सहकार्य केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन किरण जगदाळे सर यांनी केले.तर आभार प्रदर्शन नेमाने सर यांनी केले.या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल,शाळा व ग्रामपंचायतच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.


77
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!