केज/प्रतिनिधी
एको देव: सर्वभूतेषु गुढ : सर्व व्यापी सर्वभूतान्तरामा या उपनिषदातील श्लोका नुसार ईश्वर हा एकच असून त्याची रूपे अनेक आहेत तसेच सर्व प्राणी मात्रामध्ये गुढ रूपाने वास्तव्य करत असल्याचे प्रतिपादन ह.भ.प महंत श्रीराम महाराज विडेकर यांनी केले.विडा येथे महाशिवरात्री निमीत्ताने आयोजित किर्तन सेवेत ते बोलत होते.ज्ञानेश्वरादी सर्व संत हे विठ्ठल उपासक आहेत आणि या वारकरी संप्रदायाचे एक तत्व असून ते म्हणजे अनेकात्वांमध्ये एकत्व पाहणारा संप्रदाय आहे असे सांगितले या पर्व दिनानिमित्त त्यांनी कीर्तन सेवा करिता
स्वर्ग जयाची साळोंखा ।
समुद्र पाळी पिंड देखा ।।
शेषासरखि बैसका ।
जो आधार ही लोकीं ।
या संत ज्ञानेश्वरांच्या ईश्वर रूपाचे वर्णन पर अभंग वर निरूपण करताना त्यांनी ज्याची साळोंखा स्वर्गाला भिडली आहे व खालच्या पिंडीनेसमुद्राचा ठाव घेतला आहे जो शेषा सारखे बैठक करून बसला आहे तसेच ब्रह्मानंदी मन अर्पण करून ज्योतिर्लिंग हृदयात धारण केले असे भगवान शंकराच्या रूपाचे वर्णन केले आहे याप्रसंगी ह.भ.प सखारामजी कदम महाराज,महिपती बुवा ह.भ.प आंधळे बंधू,बाळा निर्मळ,तुकारामजी पटाईत,बबनदादा पवार, बाबा वाघ या भजनी मंडळी सह ह.भ.प केशव बापु देशमुख,पांडुरंग पवार,बाबासाहेब भाऊ, बळीराम देसाई,नवनाथ काका,भालेकर फौजी, नारायण देवा,जगन्नाथ गुरुजी यांच्यासह बहुसंख्येने महिला व पुरुष भक्त मंडळी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन बाळासाहेब सावंत यांच्या परिवाराने केले होते.













