पोलिस प्रशासन न्यूज.

आई-वडिलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थिनींनी अभ्यास करावा -डॉ.हनुमंत सौदागर


केज/प्रतिनिधी

ध्येय निश्चित केल्याच यश प्राप्ती होते.आई वडिलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत असे मत डॉ. हनुमंत सौदागर यांनी व्यक्त केले ते केज येथील सरस्वती कन्या प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष

मुख्याध्यापिका श्रीमती डोंगरे मॅडम,प्रमुख पाहुणे डॉ.हनुमंत सौदागर,श्री. चाळक सर यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहशिक्षक श्री.जोगदंड सर यांनी केले.यावेळी ते म्हणाले की,संयमाने जग जिंकता येते असे मत व्यक्त केले.श्री.चाळक सर म्हणाले की,अभ्यास करून परिस्थिती बदलता येते.अध्यक्षीय समारोप करताना श्रीमती डोंगरे मॅडम म्हणाल्या की, शिस्त आणि संस्कार विद्यार्थ्यांच्या अंगी असणे आवश्यक आहे.ज्ञानाची शिदोरी घेऊन जीवन समृद्ध करा असे मत व्यक्त केले.यावेळी श्री. ढाकणे सर,श्री.सुसंगे सर,श्रीमती नेहरकर मॕडमश्रीमती मोठाडे मॕडम आदींची उपस्थिती होती.यावेळी दहावीच्या अनेक विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले.पुढे बोलतांना डॉ.सौदागर सर म्हणाले की,कॉपी पासून दूर राहा. शिक्षणाचा उपयोग व्यवहारीक जीवनामध्ये केला पाहिजे. समाजातील प्रत्येक घटकाशी आपला संबंध जोडलेला असतो.शिक्षण घेत असताना आपण सर्वप्रथम आपला मार्ग शोधला पाहिजे तरच आपल्याला ते ध्येय साकार करता येईल. विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांशी प्रमाणिक राहून अभ्यास करावा यामुळे आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करता येईल असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे संचलन नववीच्या विद्यार्थिनीनी केले कार्यक्रमास विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


77
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!