पोलिस प्रशासन न्यूज.

कर्तव्यदक्षतेला मिळाले यश; संजय वडमारे (राजाभाऊ) यांची PSI पदावर पदोन्नती


बीड | प्रतिनिधी :

बीड जिल्हा पोलीस दलात प्रामाणिकपणा, कार्यतत्परता आणि जनतेशी जिव्हाळ्याने काम करणारे पोलीस कर्मचारी म्हणून ओळख असलेले संजय वडमारे (राजाभाऊ) यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर पदोन्नती झाली आहे. ही पदोन्नती बीडचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक नवनीत कावत, यांच्या आदेशाने देण्यात आली असून, याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक सचिन पांडकर उपस्थित होते. या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संजय वडमारे (राजाभाऊ) यांनी पोलीस दलात कार्यरत असताना अनेक जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडल्या. गुन्हे नियंत्रण, कायदा व सुव्यवस्था राखणे तसेच नागरिकांशी सौहार्दपूर्ण संवाद ठेवणे या बाबींमध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. त्यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे आणि मेहनतीमुळे त्यांना ही पदोन्नती मिळाल्याचे सहकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

त्यांच्या या यशाबद्दल सामाजिक, राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. “प्रामाणिक सेवा आणि कर्तव्यनिष्ठेचे हे यश आहे,” अशा शब्दांत अनेकांनी त्यांचा गौरव केला.

संजय वडमारे (राजाभाऊ) यांच्या पदोन्नतीमुळे बीड जिल्ह्याच्या पोलीस दलात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.


77
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!